रोट इज नॉट राइट (घोकंपट्टी बरोबर नाही) - ते टाळण्याची तीन कारणे

यापैकी तुम्ही कोण आहात?

बहुदा तुम्ही सुद्धा घोकंपट्टी करणारेच असाल, म्हणजे संकल्पना थोड्याफार समजून घेऊन बाकी, चमत्कार होऊन परीक्षेला सर्व आठवेल या हिशोबाने पाठांतर करत असाल. सोप्या शब्दांत सांगायचे तर, घोकंपट्टी म्हणजे, एखादी गोष्ट वारंवार वाचून ती लक्षात ठेवण्याची सवय. थोड्या कालावधीसाठी याचा नक्कीच फायदा होतो, परंतु तुम्हाला जर शिकलेल्या गोष्टींचा भविष्यात देखिल फायदा व्हावा असे वाटत असेल, तर तुम्हाला संकल्पना समजून घेण्याची सवय लावून घ्यावी लागेल.

घोकंपट्टी टाळण्या मागची तीन कारणे :

1. तुम्ही जो अभ्यास करत असाल, तो समजून घेतला नाहीत, तर तुम्ही तो विसरून जाल

तुम्हाला जर तुमच्या पूर्वपरीक्षेत आणि अंतिम परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील, तर तुम्हाला घोकंपट्टीच्या फासातून बाहेर पडून, जे वाचताय ते नीट समजून घ्यावे लागेल.

2. जेव्हा तुम्ही फक्त घोकंपट्टी करून शिकत असता तेव्हा ते शिकणे "यंत्रवत" होते.

"बहुतांशी भारतीय तरूणांकडे (सुमारे 80-85%) कोणत्याही प्रकारच्या कामाचे योग्य प्रशिक्षण नसते. घोकंपट्टीवर भर देणारी आपली शिक्षणप्रणाली, उद्योजक घडविण्यासाठी उपयुक्त नाही."

- इन्फोसिसचे संस्थापक, नारायण मूर्ती [1]

घोकंपट्टी केल्याने तुम्ही जो अभ्यास करता, तो यंत्रवत वाटू लागतो आणि मग तुमचे त्यातील स्वारस्य कमी होऊ लागते. याचा दोन प्रकारे परिणाम होऊ शकतो - एक म्हणजे तुम्ही परिक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करू असे म्हणून अभ्यास करणे टाळाल, किंवा नोट्स बनवून (टिपणे काढून) कंटाळून जाल. यावर उपाय म्हणजे, थोडासा बदल करणे.

तुम्ही अभ्यास करण्याच्या पद्धतीत बदल म्हणून, टेड टॉक व्हिडिओज् आणि गूगल स्कॉलर यांचा वापर करू शकता.

3. संकल्पनांचा दैनंदिन जीवनातील गोष्टींशी मेळ घालणे कठीण होते

"रक्तवाहिन्यांचे तीन प्रकार असतात - आर्टरीज् (धमन्या /रोहिणी), व्हेन्स (शीरा /नीला) आणि कॅटरपिलर्स (सुरवंट)."

ज्या कोणी हे लिहिले असेल, तो नक्कीच शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ न समजल्यामुळे, कॅपिलरीज् (सुक्ष्मरक्तवाहिनी) आणि कॅटरपिलर (सुरवंट) यांच्या मध्ये गोंधळला असेल. म्हणूनच तुम्ही जो अभ्यास कराल तो दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी संकल्पना समजून घेणे अत्यंत महत्वाचे असते.

तुम्हाला रक्तवाहिन्यांबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे? त्यासाठी पुढे पीसी स्त्रोत दिला आहे.
https://study.com/academy/lesson/blood-vessels-arteries-capillaries-more.html

प्रत्येक विषयाशी संबंधित वेबसाइट्स तर उपलब्ध आहेतच पण, त्याबरोबर तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरतील असे इतरही अनेक पीसी टूल्स उपलब्ध आहेत. तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेले प्रयोग पहाण्यापासून ते तुम्ही तयार केलेल्या नोट्स (टिपणे) नीट लावून तुम्हाला अभ्यासाच्या वेळेस योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पीसी ची मदत होते. पीसी च्या मदतीने तुम्ही परीक्षेचा अभ्यास करताना घोकंपट्टी करणे टाळू शकता.