घोकंपट्टी विरूद्ध पीसी च्या मदतीने केलेला अभ्यास

 

घोकंपट्टी म्हणजे काय?

घोकंपट्टी म्हणजे एखादी माहिती परत परत वाचून लक्षात ठेवणे. उदाहरणार्थ - अक्षरे, आकडे आणि पाढे लक्षात ठेवणे. तुमची मुले जेव्हा प्राथमिक शाळेत असतात, तेव्हा त्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी घोकंपट्टी करून अभ्यास करणे ठीक असते.

पीसी च्या मदतीने केलेला अभ्यास म्हणजे काय?

अनेक शाळांमध्ये वापरली जाणारी ही शिकविण्याची नविन पद्धत आहे. यात मुलांना, वर्गात जे शिकविले जाते त्यात गुंतवून ठेवण्यासाठी पीसी ची मदत घेतली जाते. ही एक संवादात्मक आणि संवेदनाक्षम पद्धत आहे. या पद्धतीत, वर्गात शिकविल्या जाणा-या संकल्पना नुसत्या वरवर वाचून परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यापेक्षा, त्या मुलांना समजण्यावर भर दिला जातो. उदाहरणार्थ - आभासी फिल्ड ट्रिप्स, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, व्हिडिओज्, सादरीकरण इत्यादी.

तुमच्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी कोणत्या शिक्षणपद्धतीचा अवलंब करावा ते ठरविण्यासाठी पुढे तुलनात्मक मार्गदर्शन केले आहे:

तर मग, तुमच्या पाल्यासाठी जास्त योग्य काय आहे?

घोकंपट्टी आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये खोलवर रूजली आहे - त्यामुळे तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही. परंतु तुम्ही तुमच्या पाल्याच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये, पीसी चा वापर करून शिकण्याचा अंतर्भाव करू शकता. त्याचा तुमच्या पाल्याला भविष्यात नक्कीच फायदा होईल.