तुमचे स्वतःचे विकी स्पेसेस वर्ग बनवा

 

तंत्रज्ञान मला माझे पाठ चांगल्या पद्धतीने योजनाबद्ध करून माझ्या विद्यार्थ्यांसोबत सर्वार्थाने जोडण्यास मदत करते.

- मिस रश्मी काठुरिया, यांना 2007 मध्ये डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी भारतातील सर्वोत्तम इ-शिक्षिका म्हणून गौरविले होते

विकी एक अशी वेबसाइट आहे ज्यावरील पेजेसवर आपण स्वतःचे लेख लिहू शकतो किंवा त्या पेजेसवरील माहिती मध्ये बदल करू शकतो. [1] हे  विकीपिडीया सारखेच आहे परंतु फक्त अशा छोट्या वर्गापुरतेच मर्यादित आहे ज्यांत पी सी चा वापर करून शिकविण्याची पद्धत आहे. यात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन त्यांना सहयोगाने, संशोधनावर लक्ष कॆद्रित करून अभ्यासात रमविण्यावर भर दिला जातो. याशिवाय यात शिक्षक विद्यार्थ्यांना दिलेल्या कामावर आणि त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवू शकतात आणि विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि स्वातंत्र्याची भावना वाढीस लावू शकतात.

तुम्ही पुढे दिलेल्या पद्धतीने स्वतःचे विकी वर्ग तयार करू शकता:

पायरी 1:

गूगल साइट्स वर तुमची एक वेबसाइट तयार करा ज्याला ग्रेड, विषय आणि पाठ यांच्या अनुसार नावे द्या.[2]

पायरी 2:

तुमच्या उद्दिष्टांच्या अनुसार - ग्रुप असाइनमेंट किंवा सर्वसमावेशक ज्ञान (दोन्ही असले तरी चालतील) यांच्या आधारे माहिती द्या आणि मार्गदर्शक तत्वे तसेच सुरक्षितता नियम देखिल नेमून द्या. तुम्ही वेबवरून लिंक्स घेऊ शकता आणि आधीच्या असाइनमेंट्स दाखवू शकता म्हणजे विद्यार्थ्यांना काय करायचे त्याचा अंदाज येईल. विद्यार्थ्यांनी त्याचा पुन्हा पुन्हा वापर करावा म्हणून त्यांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य द्या म्हणजे त्यांना प्रभावशाली असल्यासारखे वाटेल.[3]

पायरी 3:

विद्यार्थ्यांचे इ-मेल आय डी घ्या आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या विकी वर्गाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी आमंत्रित करा. वर्गात नीट सविस्तर वर्णन करून एखादा पाठ शिकवा आणि तुमच्या शिकविण्यात हळूच विकी चा वापर करा.[4]

कोणतीही गोष्ट नविन असताना त्याचे आकर्षण वाटतच असते परंतु तुमच्या विद्यार्थ्यांनी नेहमीच विकी चा वापर करावा असे तुम्हाला वाटत असेल तर, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा. त्यासाठी स्कोरबोर्ड आणि बक्षिसांचा वापर करा (मुळात आपण सर्वच स्पर्धेसाठी उत्सुक असतो). विविध समुहांमध्ये स्पर्धा घेऊन सर्वांना सहभागी करून घेता येईल म्हणजे कोणालाही एकटे पडल्यासारखे वाटणार नाही. बक्षिस म्हणून तुम्ही गुण देऊ शकता किंवा त्यांच्या आवडीच्या विषयाबद्दल फिल्ड ट्रिप ला जाण्याची संधी देऊ शकता.

"वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करणे नक्कीच फायदेशीर आहे आणि आता आपण सर्वांनी मिळून तंत्रज्ञानाचा वापर करून एक वर्च्युअल क्लासरूम तयार करण्याची वेळ आली आहे!"

कोणत्याही शिक्षकांना जर त्यांच्या शिकविण्यात पी सी चा वापर करायचा असेल तर, त्यांच्यासाठी देशातील सर्वोत्तम इ-शिक्षिकेचा किताब मिळालेल्या मिस रश्मी काठुरियांचा अतिशय चपखल संदेश.[5]