स्टीम शिक्षण : शिक्षकांनी जाणून घ्यावे असे सर्व मुद्दे

 

तुमचा वर्ग म्हणजेच जगाचे भविष्य आहे आणि भविष्य हे आजच्या पेक्षा कित्येक पटींनी जास्त हाय-टेक (उच्च तंत्रज्ञानाचे) आहे. मुलांना चांगल्या कारकीर्दीसाठी, शक्य तितक्या लहान वयापासून सक्षम बनविणे, हे एक शिक्षक म्हणून तुमचे कर्तव्य आहे. इथेच स्टीम शिक्षणाचा मुद्दा समोर येतो.

STEAM (स्टीम शिक्षण) म्हणजे काय?

स्टीम शिक्षणात पुढील गोष्टींचा अंतर्भाव असतो-
1. सायन्स (विज्ञान)
2. टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान)
3. इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी)
4. आर्ट (कला)
5. मॅथमॅटिक्स (गणित)

सध्या उपलब्ध असलेल्या किंवा भविष्यात निर्माण होऊ शकणा-या, कारकीर्दीच्या अनेक विकल्पांसाठी वर दिलेल्या विषयांचे ज्ञान असणे महत्वाचे ठरते.
प्रत्येक विषयातील महत्वाच्या संकल्पना विद्यार्थ्यांना नीट समजावून देणे हा यामागील मूळ उद्देश आहे. त्या संकल्पना समजल्या की विद्यार्थी त्यांचा परस्पर संबंध जाणून प्रश्न सोडवू शकतात. याचा उपयोग त्यांना भविष्यात संशोधन, प्रयोग, प्रकल्प इत्यादी गोष्टींसाठी पीसी चा वापर कसा करायचा ते समजण्यासाठी होतो आणि त्यांच्यात अत्यंत आवश्यक अशी क्रिटिकल थिंकिंग (बारकाईने विचार करण्याची) कौशल्ये वाढीस लागतात.

स्टीम शिक्षण महत्वाचे का आहे?

समस्या आली तर मुलांना स्वतःला ती सोडविता येणे अतिशय महत्वाचे असते. स्टीम मधले विषय मुलांमध्ये एक्सप्लोरर माइंडसेट (शोधप्रवृत्ती) निर्माण करण्यात मदत करतात आणि त्यांची, बारकाईने विचार करण्याची कौशल्ये वाढीस लागतात.

स्टीम शिक्षणचे भवितव्य काय?

हे विषय किंवा किमान त्यातील मूलभूत संकल्पना आपल्या देशातील सर्व शैक्षणिक बोर्डांमध्ये सुरूवातीपासूनच शिकविल्या जातात. परंतु त्यांच्या तीव्रतेवर भर देण्याची गरज असते. मुलांच्या मेंदूला जास्त चालना मिळावी असे अभ्यासेतर उपक्रम असोत किंवा गृहपाठ असो, किंवा स्टीम च्या थीम नुसार नियमितपणे केल्या जाणा-या फिल्ड ट्रिप असोत, या लहान लहान गोष्टींचा तुमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.

तुमच्या वर्गात नियमितपणे स्टीम शिक्षण व्हावे यासाठी तुम्ही पुढील पाच गोष्टी करू शकता :

1. मुलांना ज्या गोष्टींबद्दल आवड आहे त्यांची माहिती मिळविता यावी म्हणून शाळेत मेकरस्पेस तयार करून घ्या.
2. नेहमीपेक्षा वेगळा असा गृहपाठ द्या किंवा काही विशेष सामग्रीची आवश्यकता नसेल असे मेकरस्पेस प्रकल्प करायला द्या.
3. तुमच्या विद्यार्थ्यांना शाळेत पीसी वापरता येईल अशी व्यवस्था तर कराच, पण त्याचबरोबर मुलांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरावे म्हणून पालकांना देखिल पीसी घेण्यास प्रोत्साहन द्या.
4. स्टीम विषयांबद्दल विद्यार्थ्यांना कुतुहल निर्माण होऊन त्यांना बोलतं करता येईल अशा उपक्रमांद्वारे वर्गात संवादात्मक वातावरण ठेवा.
5. वर्गात होणा-या चर्चा आणि वादविवाद यांमुळे मुलांचे त्या विषयाबद्दलचे कुतुहल वाढते त्यामुळे समुह कार्याला उत्तेजना द्या.

शिकविण्यासाठी शुभेच्छा !