विद्यार्थ्यांना त्यांचे कॅमेराज चालू ठेवण्यासाठी प्रेरित करण्यासाठी उपाय

मागील दोन वर्षांनी शिकण्याच्या सर्व पारंपारिक नियमांची पुनःपरिभाषा केली आहे. ऑनलाइन वर्गांमुळे दिवसातील बहुतेक वेळ आपल्या लॅपटॉपला चिकटून राहिल्याने मुलांचे थकणे सामान्य आहे. यात आपल्या सहपाठींसोबत मिळणारी मजा चुकण्याचा देखील समावेश आहे. यातून मार्ग काढण्यासाठी, शिक्षक ऑनलाइन वर्ग मजेदार बनवण्यासाठी सामाजिक-भावनात्मक शिक्षणाच्या पद्धतीचा वापर करू शकतात आणि विद्यार्थ्यांना त्यांचे कॅमेरे चालू ठेवण्यास प्रोत्साहित करत विद्यार्थ्यांदरम्यान सामुदायिक संवेदना निर्माण करू शकतात आणि खालील गोष्टींचा अवलंब करू शकतात:

भूमिका बजावण्याचा अभ्यास: साहित्याच्या वर्गात भूमिका बजावणे उर्जेस चालना देण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. विद्यार्थ्यांना भूमिका दिल्या जाऊ शकतात आणि तुम्ही नाट्य किंवा धडा वाचत असताना त्यांना बजावण्यास सांगितले जाऊ शकते.

गोष्टींच्या वेळेचा वापर: वर्गाची शेवटची वेळ गोष्टी सांगण्यासाठी राखत विद्यार्थ्यांना एक विराम घेण्यास प्रेरित करा. तात्पर्य असलेली एखादी मजेदार गोष्ट तुमच्या लहान विद्यार्थ्यांचा दिवस उजळू शकते. विद्यार्थ्यांना त्यांचा कॅमेरा चालू ठेवण्यास सांगा आणि प्रत्येक वर्गाच्या शेवटी एक गोष्ट सांगा. यामुळे कालांतराने त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या सर्वांसमोर बोलण्याच्या कौशल्यात सुधारणा होऊ शकेल.

नाविन्यपूर्ण प्रस्तुती: शालेय कामाच्या व्यतिरिक्त अन्य विषयांवरील प्रस्तुतीमुळे विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच, ते वर्गाशी आपलेपणा परत आणण्यासाठी एकत्र काम करत सामुहिक प्रकल्प प्रस्तुत करू शकतात

याच्या व्यतिरिक्त, तुम्ही विद्यार्थ्यांना रोजच्या कामांविषयी एकमेकांशी संवाद साधू देऊ शकता, एकमेकांच्या प्रगतीचा आढावा घेण्याचे शिकवू शकता आणि एकमेकांच्या सहकार्याने शिकण्याच्या पद्धतीची ओळख करून देऊ शकता. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात आत्मविश्वास येईल आणि निष्क्रिय सहभागी होण्याऐवजी त्यांचे कॅमेरे चालू ठेवत भाग घेतील.