शिक्षिका चे मत : माझ्या पीसीशिवाय शिकविण्याची मी कल्पना देखील करू शकत नाही

 

जॅसमिन सिद्धूः
पंजाब मधील आयटी इंजिनिअर, जॅसमिन पंजाब मधील नामांकित शाळा-ओक्रिज इंटरनॅशनल स्कूल, मोहाली येथे कॉम्प्युटर सायन्स शिकवितात. त्यांच्या वर्गात खास करून अनुक्रमे आयबी, आयजीसीएसई आणी सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रि-प्रोग्रामिंग आणि प्रोग्रामिंग ह्यावर अधिक भर दिला जातो.

१) तुम्हाला शिक्षिका बनण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली?
मला असलेल्या गॅजेटसच्या आवडीमुळे मला त्या विषयाकडे व्यावायिकरित्या पाहण्याची प्रेरणा मिळाली आणि म्हणून मी रोबोटिक्समध्ये शिकविण्याच्या करिअरची सुरूवात केली. पहिल्या डेल लॅपटॉपने त्याची सुरूवात झाली जे माझे स्वतःचे गॅजेट होते.

२) शिक्षणासाठी पीसी - तुम्ही त्यावर काय करता?
सर्व काही एकाच सर्वरवर उपलब्ध असेत आणि हा एक सुंदर उपक्रम आहे ज्यात शिक्षक साहस करू शकतो. आम्हाला जो विषय शिकायचा आहे किंवा त्यात संशोधन करायचे आहे तो ऑनलाईन उपलब्ध असतो. आणि तो उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्यापाशी पीसी असावा लागतो.

३) तुम्ही शिकविण्यासाठी तुमच्या पीसीचा कसा उपयोग कराल हे आम्हाला सांगा.
रोबोटिक्स आणि सेन्सर्सचे युट्यूबवरील व्हिडिओज. व्हिजुअल मिडियामुळे नेहमीच आपल्या स्मरणशक्तीवर त्याचा न पुसणारा ठसा निर्माण होतो. म्हणून मी माझ्या शिकविण्यात चित्रांचा आणि व्हिडिओजचा समावेश करते.

४) पाठाचे अचूक नियोजन करण्यासाठी तुमच्यापाशी कोणत्या तीन गोष्टी असल्याच पाहिजेत?
माझा डेल लॅपटॉप, चांगला विषय आणि चौकस बुद्धी.

५) वर्गाचा उत्साह वाढविण्यासाठी शिक्षिकेने काय करावे?
चर्चा आणि चौकसपणा यांचे वातावरण निर्माण करावे.

६) भारतात शिक्षकी पेशाचे भविष्य काय आहे असे तुम्हाला वाटते?
खास करून आपल्या देशात हा एक पुरातन आणि सर्वाधिक प्रतिष्ठा लाभलेला व्यवसाय आहे. अजून बर्&zwjयाच संधींचा उपयोग करण्यात आलेला नाही. परंतु स्मार्ट वर्ग हे निश्चितपणे भविष्यातील टिचिंग प्रोग्रामिंगचा हिस्सा असतील.

७) तुमच्या करिअरचा विकास करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करत आहात?
सातत्याने प्रगतिशील असलेल्या तंत्रज्ञानाची ताजी माहिती मिळवत असते.

८) सहज म्हणून सांगा, तुम्ही तणाव कमी करण्यासाठी सुट्टीवर असता तेव्हा काय करता?
मी लाईफस्टाईल ब्लॉगर आहे आणि बहुतेक वेळ ऑनलाईन घालविते आणि लिखाण करते.

९) तुम्हाला वर्गात विद्यार्थ्यांनी विचारलेला सर्वात धमाल प्रश्न कोणता आहे?
मी जेव्हा सर्वप्रथम माझा डेल लॅपटॉप वर्गात नेला तेव्हा विद्यार्थ्यांनी विचारलेः ‘‘तुम्ही आम्हाला चित्रपट दाखवणार आहात का?’’ मला वाटते मला तेव्हा लक्षात आले की मी जर माझे मुद्दे व्हिडिओजद्वारे समजावून सांगितले तर माझ्या विद्यार्थ्यांना ते शिकताना किती आनंद मिळेल.

१०) तुमचे कौशल्य सुधारण्यासाठी तुम्ही काय करत आहात?
मी विज्ञानाच्या विकासात खूप जास्त रस घेते आणि त्याचा सखोल अभ्यास करते.

११) भारतातील विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजांसाठी तुम्ही काय करणार आहात?
सरासरी भारतीय मुले खूप स्मार्ट आणि चौकस आहेत. त्याचा विकास व्हावा आणि त्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी त्यांना मदत करणे ही काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे, त्यांचे छंद जोपासणे आणि तो अधिक कसा विकसित करता येईल आणि ती करिअरची संधी कशी बनविता येईल ह्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करणे.

१२) डेलच्या आरंभ - शिक्षणासाठी पीसी या उपक्रमा विषयी तुमचे मत काय आहे? तुम्हाला त्यात सहभागी होण्यास आवडेल का?
मला असे वाटते की हा अतिशय उत्तम उपक्रम आहे आणि अनेकांचा त्यामुळे फायदा होईल. मला त्यात सहभागी होण्यास निश्चितच आवडेल.