शिक्षक दिन 2019: # DellAarambh उपक्रमासाठी एक विशेष दिवस

 

डेल आरंभ हा संपूर्ण भारतासाठीचा ‘शिक्षणासाठी पीसी’ असा उपक्रम आहे, जो तंत्रज्ञानाची शक्ती वापरुन शिक्षणाची वाढ करण्यासाठी आखण्यात आलेला आहे. पालक, शिक्षक आणि मुलांचा   

#DigitalIndia मधील पाया मजबूत होईल अशा रितीने याची रचना केली आहे.

 

एखाद्या शिक्षकासाठी, विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा आलेख भविष्य-सिद्ध करण्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नसते आणि ते स्वतःला भविष्य-सिद्ध करण्यातूनच घडते – इथे प्रवेश होतो शिक्षणासाठी पीसीचा.

एखाद्या शिक्षकाकडे जेव्हा पीसी असतो तेव्हा तो वर्गात चमत्कार घडवू शकतो, 79590 आणि अजून वाढत असलेल्या डेल आरंभ प्रमाणित शिक्षकांपैकी काहींचे अनुभव असे आहेत.

1. पीसीमुळे तुमच्या करिअरमध्ये सुधारणा होण्यास कशी मदत झाली?

a.  पुस्तकांचा वापर ते सॉफ्ट कॉपी स्वरूपातील नोट्स आणि आता पीसीवरील प्रेझेंटेशन्स असा भारतीय शिक्षणपद्धतीत बदल होत गेला आहे. हा बदल आमूलाग्र स्वरूपाचा आहे आणि भारत त्याच्या केंद्रस्थानी आहे!

2. जेनझेड विद्यार्थ्यांच्या शिक्षकाला शिक्षणामधील कोणते लोकप्रिय ट्रेंड माहित असले पाहिजेत?

a.  सध्याचे उत्कृष्ट ट्रेंड आहेत वर्गानंतरची चर्चा आणि विद्यार्थ्यांशी पीसीद्वारे संपूर्ण धडे शेअर करणे. कम्युनिकेशन, कम्युनिकेशन आणि अधिक कम्युनिकेशन हा याचा गाभा आहे.

3. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आलेखाचे मूल्यांकन करण्यात तंत्रज्ञानाने कशी मदत केली आहे?

a. पीसीमुळे शिक्षकांना तत्काळ निकाल मिळतात, त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गरजांना प्रतिसाद देण्यात मदत करण्यासाठी आणि धड्याचे अधिक चांगले नियोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा रियल-टाइम डेटा उपलब्ध होतो जेणेकरून विद्यार्थ्यांचा अध्ययन परिणाम सर्वोत्तम बनतो. शाळांमधील संगणक प्रयोगशाळा आणि इंटरनेटची उपलब्धता यामुळे फारशा शारीरिक ताणाशिवाय त्यांच्या शिक्षणाचे मूल्यांकन करण्यास मदत होते. हळूहळू भारतामध्ये डिजिटल मार्किंग सर्वसामान्य बनणार आहे.

4. गेल्या काही वर्षांत शिक्षणामध्ये कसे परिवर्तन झाले आहे?

a. तंत्रज्ञानात वेगाने झालेल्या बदलांमुळे भारतातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामग्रीच्या वापराच्या पद्धतीत बदल झाला आहे. इंटरनेट-युक्त पीसी ही काळाची गरज बनली आहे, जी सर्व अध्यापन/अध्ययन पद्धतींची कायमची जागा घेणार आहे.

सकारात्मक डिजिटल पाऊलखुणा निर्माण करण्यासाठी गुंतागुंत विरहित वर्गांचा आवाका शिक्षकांच्या लक्षात आला आहे. या #TeachersDay ला त्यांच्या अध्यापन प्रणाली पीसी-समर्थ बनवून त्यांच्या विशेष योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करू या, एकावेळी एक पीसी याप्रमाणे!