डिजिटल पालकत्वातील महत्वाच्या गोष्टींची यादी

 

पालकत्व

ही जर नोकरी असती, तर ते काम पूर्णवेळाचे म्हणजेच 24/7 ठरले असते.

तुमची इच्छा असो वा नसो, तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो.

आता महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही डिजिटल पालकत्वातील मातब्बर कसे बनू शकाल?

 

1. याची सुरूवात तुमच्यापासून होते

जर एखादी गोष्ट तुम्हाला समजत नसेल, तर संशोधन करा. त्याबाबत, इतर पालकांशी, तुमच्या मुलांच्या शिक्षकांशी, सहकाऱ्यांशी, शेजाऱ्यांशी आणि तुमच्या परिचयातील सर्वांशी बोलून तुमचे ज्ञान वाढवा. पुढची पायरी म्हणजे तुमच्या मुलांना एखादा पीसी स्त्रोत पहायला देण्याआधी तुम्हा स्वतः तो तपासून पहा.

 

2. तुमच्या लहानग्यांसाठी तुम्ही रोल मॉडेल (आदर्श) असता

तुम्ही त्यांचे पहिले सुपरहीरो असता. तुम्ही जे काही करता त्याला ते उदाहरण म्हणून बघतात. जर तुम्ही तुमच्या मुलांकडे दुर्लक्ष करून स्क्रीन कडे बघत राहिलात किंवा तंत्रज्ञानाच्या मागे जास्त वेळ घालवलात, तर तुमच्या मुलांना वाटेल की तसे करणे योग्य आहे आणि मग ते देखिल तसेच वागायला लागतील. याउलट जर तुम्ही संतुलितपणे वागत राहिलात आणि योग्य प्रकारे उठबस केलीत तर तुमची मुले देखिल त्याप्रमाणे वागतील.

 

3. पेरेन्टल कंट्रोल (पालक नियंत्रण) हे मदतीसाठी असते

पीसी वर तुमच्या मुलांसाठी स्वतंत्र यूजर प्रोफाइल तयार करा आणि नंतर हळूहळू इतर वेबसाइट्स वापरण्यास सुरूवात करा. गूगल आणि यूट्यूब या दोन महत्वाच्या वेबसाइट्स आहेत. एकदा का तुम्ही त्यांच्यासाठी पेरेन्टल कंट्रोल सेट केलेत की मग तुम्ही निर्धास्त होऊ शकता.

 

4. पुन्हा एकदा नियमांना महत्व द्या

नियंत्रक बनायला कोणाला आवडत नाही? जर तुम्ही मुलांना त्यांचे स्वतःचे नियम बनवू दिलेत, तर त्यांना ते मोडण्याची इच्छा होणार नाही. मुलांबरोबर बसा आणि नियम लिहून काढा. मुलांना त्यामागचे कारण समजावून सांगितले तर कठीण पासवर्ड सेट करणे आणि तो तुम्हाला सांगणे, फक्त बुकमार्क केलेल्या वेबसाइट्स वापरणे आणि दिवसातून एक किंवा जास्तीत जास्त दोन तास पीसी वापरणे यांसारखे मूलभूत नियम तुमची मुले सहजपणे स्विकारतील.

 

5. समाजात मिसळणे चांगले असते

खरंतर ते अतिशय उत्तम असते!

पण ते करताना तुम्ही विचारपूर्वक वागणे गरजेचे असते. तुमच्या मुलांचे एखादे सिक्रेट (गौप्य) अकाउंट नाही याची खात्री करून घ्या.

त्याचबरोबर तुम्ही मुलांना थोडा मोकळपणा देखिल दिला पाहिजे. त्यांनी लिहिलेल्या गोष्टींबद्दल अतिचिकित्सक बनू नका किंवा त्यांच्या पोस्टवर उगीचच टीका करू नका.

तुम्ही आणि तुमच्या मुलांनी एकमेकांकडून शिकले पाहिजे. तुमचे अनुभव त्यांना सांगा आणि त्यांच्या अनुभवांबद्दल तुमच्याशी बोलण्यास त्यांना प्रोत्साहित करा. शेवटी, तंत्रज्ञानाबरोबर मोठे होणे आणि ते करताना एकत्र आनंद मिळवणे हेच महत्वाचे असते.