हे आहे शिक्षणाचे भवितव्य: शिक्षणक्षेत्रातील ह्या प्रवाहांचा परिचय करून घ्या

 

माहितीचा झटपट स्रोत, अभ्यास-विषयाची सखोल माहिती मिळवण्याची संधी आणि स्व-परीक्षण या कारणांमुळे घरी तसेच शाळेत देखील तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी कॉम्प्युटर अनिवार्य ठरत आहे. हा विचार त्यामानाने जरा नवीनच असला तरीही, फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात, काय स्वीकारावे आणि काय गाळावे, यासंबंधी अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. म्हणूनच खरा काय आणि खोटं काय यातला फरक तुम्हाला इथे समजेल.

१. सेल्फ-पेस्ड लर्निंग (स्व-गतीने अध्ययन)

तुमचे दिवसभराचे काम तुमच्या मर्जीने, तुम्हाला हवे तसे पार पडले की तुम्हाला अर्थातच खूप आनंद होतो, नाही का?

त्याचप्रमाणे मुले जेव्हा स्वत:च्या अभ्यासाचे स्वत: नियोजन करतात, तेव्हा त्यानाही तसाच आनंद होतो. सेल्फ-पेस्ड लर्निंगमुळे मुले कॉम्प्युटरच्या मदतीने कधीही, कुठूनही शिकू शकतात मग ती घरी असोत किंवा शाळेत. परिणामी मुलांचा अभ्यासातील रस तर वाढतोच, शिवाय त्या विषयाचे आकलन देखील सुधारते.

२. पालकांचा वाढता सहभाग

मुलांचे अर्धवार्षिक किंवा वार्षिक प्रगतीपुस्तक हातात येईल किंवा आपल्या मुलाची प्रगती कशी आहे, यासाठी पालकसभांची वाट बघत बसण्याचे दिवस आता गेले. आता पूर्ण वर्षभर शिक्षक नियामितपणे पालकांना ई-मेल अपडेट्स पाठवू शकतात, क्लाऊड बेस्ड पोर्टल्स किंवा विकीस्पेसेस क्लासरूमच्या मदतीने पालक वर्षाभर मुलांसाठी असाईनमेंट्स आणि टेस्ट्स मिळवू शकतात. याप्रकारे आपल्या मुलाची प्रगती समाधानकारक आहे आठवा नाही हे पालकांना योग्य रीतीने समजू शकते आणि फार उशीर होणाआधीच आपल्या मुलांना आवश्यक ती मदत करू शकतात.

३. BYOD चा प्रसार

BYOD – (ब्रिंग युवर ओन डिव्हाईस) तुमचे स्वत:चे डिव्हाईस बाळगा, हा मुलांसाठी अतिशय उत्साही आणि प्रभावी मार्ग आहे कारण वर्गात शिकलेली कॉम्प्युटरची उपयुक्तता त्यांना तिथल्या तिथेच अंमलात आणता येते. मुलांना त्यांचे स्वत:चे डिव्हाईस वापरण्याचा सराव असल्यामुळे लॉग-इन करण्याचा तसेच सगळ्या गोष्टी रोज नव्याने सुरू करण्याचा किंवा कॉम्प्युटरचा वापर कसा करायचा हे शिकत बसण्याचा वेळ वाचून, त्याच वेळेत प्रत्यक्ष विषय शिकण्यासाठी अधिक वेळ मिळेल. शिवाय वर्गात संशोधन किंवा प्रोजेक्ट करताना आणि परीक्षेच्या वेळी सुद्धा रिसोर्सेस (शैक्षणिक साधने) शोधणे झटपट होईल.


४. स्टेम-लेड एज्युकेशन

आपला समाज आता पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला आहे. शाळेतील स्टेमचा वाढता प्रभाव (STEM –सायन्स, टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग आणि मॅथ्स) ही काळाची गरज आहे अजून अस्तित्वातही नसलेल्या विविध प्रकारच्या नोक-यांची मागणी पुरवण्यासाठीची ही गरज आहे! शाळांनी, लॅब प्रॅक्टिकल्सची (प्रात्यक्षिके) संख्या वाढवून, शाळेत मेकरस्पेस प्रोजेक्ट्स सुरू करून आणि मुलांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करण्यासाठी रोबोट ऑलिम्पियाड्स सारख्या अॅक्टिव्हिटीज सुरू करून, अगोदरच याची गंभीर नोंद घ्यायला सुरवात केली आहे.

शेवटी, बदल हाच शाश्वत आहे. झपाट्याने विकसित होत चाललेल्या या डिजिटल युगाला सामोरे जाण्यासाठी तुमच्या पाल्याला सज्ज करायचे असेल, तर सुरवातीलाच योग्य कॉम्प्युटर अर्थात पीसीची निवड करा आणि मग मुलांचा