शिक्षकी पेशाचे भवितव्य मला उज्वल दिसते

 

विभा कागझी या हार्वर्ड बिझनेस स्कूल मधील MBA च्या पदवीधर आहेत आणि 2018 च्या वूमेन इकॉनॉमिक फोरम मध्ये त्यांना 'वूमन ऑफ एक्सेलेंस' चा पुरस्कार दिला गेला आहे. विभा या ReachIvy च्या संस्थापिका आहेत.

1. "पीसी फॉर एज्युकेशन" (शिक्षणासाठी पीसी चा वापर) यावरील तुमचे मत काय आहे?

शिक्षण हे सामाजिक समानता निर्माण करते आणि त्यात तंत्रज्ञानाचा वापर उत्प्रेरकाचे काम करतो असे मला वाटते. पारंपारिक पाठ्यपुस्तकांमध्ये, माहितीची जास्तीत जास्त 200 - 500 पाने मावू शकतात त्याउलट एका पीसी मध्ये लाखो पुस्तकांचे ज्ञान सामावलेले असते (कदाचित त्यापेक्षाही जास्त!) आणि त्याच्या वापराने, आपल्यासाठी नविन जगाची कवाडे उघडली जातात. पीसी घेण्यासाठी एकदाच थोडीशी गुंतवणूक केली तर यामुळे अभ्यास आणि वाढीची प्रगती होते.

"शिक्षणासाठी पीसी चा वापर करण्याची योजना जर खेडेगावांमध्ये राबवली, तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी मैलोंमैल लांब जावे लागणार नाही शिवाय विद्यार्थ्यांसाठी उत्तम श्रेणीचे ज्ञान आणि शिक्षक घरातच / शाळांमध्ये उपलब्ध होतील."

2. घोकंपट्टी करून शिकणे - त्याचे काय करता येईल?

प्राचीन चायनीज तत्वज्ञानी कन्फ्यूशियस ने म्हंटले आहे, “I hear and I forget, I see and I remember, I do and I understand” म्हणजे "मी ऐकले आणि मी विसरलो, मी पाहिले आणि मला आठवले, मी केले आणि मला समजले".

यावरून आपल्या लक्षात येते की घोकंपट्टी करून शिकण्याची पद्धत का बदलली पाहिजे. शाळेत शिकलेले पायथागोरस चे प्रमेय आपल्या पैकी किती जणांना अजूनही लक्षात आहे? अगदी थोड्यांना!

"शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थी जे शिकत आहेत त्याचे अनुभव त्यांना मिळण्यासाठी, प्रयोगातून शिकणे, शिकलेल्या सिद्धांतांचा वापर करणे, वर्गातील सहभाग, फिल्ड (बाह्य) प्रकल्प आणि परिक्षेशी संबंधित नसलेले इतर उपक्रम यांना जास्त महत्व दिले पाहिजे."

अशा गोष्टी रातोरात बदलू शकत नाहीत हे जरी सत्य असले, तरी आपण योग्य दिशेने पावले उचलण्यास सुरूवात केली पाहिजे.

3. विद्यार्थ्यांचे अभ्यासाशी संबंध सुधारण्यात शिक्षक कशी मदत करू शकतात?

"विद्यार्थ्यांबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी शिक्षकांनी वर्गात शिकवताना एकटेच शिकवत न रहाता, विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन सत्र संवादात्मक बनवावे."

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये विषयाची गोडी निर्माण केली पाहिजे. आपल्या सर्वांचाच कोणता ना कोणता विषय आवडीचा असतो याचे कारण म्हणजे शिकविणा-या शिक्षकांनी तो विषय मनोरंजक बनवून शिकविलेला असतो. केवळ परीक्षेत मिळालेल्या गुणांना महत्व न देता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच, शिक्षकांनी एखाद्याच विद्यार्थ्याचे कौतुक न करता सर्व विद्यार्थ्यांना समानतेने वागवावे.

4. कोणत्याही शिक्षकाकडे असलीच पाहिजेत अशी तीन कौशल्ये कोणती?

1. वर्गात संवादात्मक सत्र घेण्याची क्षमता, विषयावरील प्रभुत्व आणि विद्यार्थांबरोबर उत्तम प्रकारे संवाद साधण्याची क्षमता.
2. पाठ्यपुस्तकात दिलेल्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर माहिती शिकणे आणि विद्यार्थ्यांना शिकविणे, आपले ज्ञान सतत अद्यावत ठेवणे.
3. विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यास प्रोत्साहित करण्याची क्षमता, उत्तम आंतर-वैयक्तिक कौशल्ये आणि विद्यार्थ्यांचा विश्वास आणि आदर संपादन करण्याची क्षमता.

5. भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे?

पूर्वी शिक्षक केवळ पाठ्यपुस्तकात दिलेल्या गोष्टी वर्गात शिकवत असत, परंतु आता परिस्थिती बदलतेय. आता शिक्षण संवादात्मक बनविले जात आहे. त्यामुळे, सरकारी आणि खाजगी क्षेत्रांनी आवश्यक तेवढी गुंतवणूक केली तर शिक्षकी पेशाचे भवितव्य उज्वल आहे असे मला वाटते.

6. वाढत्या मुलांच्या गरजांना तुम्ही कसे संबोधित कराल?

ReachIvy.com च्या मार्गदर्शनामुळे मुलांच्या मनातील गोंधळ संपतो आणि त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार कारकीर्दीची निवड करण्यासाठी मदत मिळते.