घोकंपट्टी नव्हे, तर शिक्षणाचा योग्य मार्ग

भारतीय शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांना घोकंपट्टी करुन शिकायची चांगलीच सवय असते. त्यात पुन्हा पुन्हा म्हणून वाचलेलं आठवणं आणि लक्षात ठेवणं याचा समावेश असतो. मात्र, शिकण्याच्या या पद्धतीमध्ये संकल्पना समजून घेण्याऐवजी त्या पाठ करण्यावर भर दिला जातो.

महत्वाची समस्या

भारतीय शिक्षणपद्धतीतला अभ्यासक्रम व्याख्या, संकल्पना, सूत्रं आणि वस्तुस्थिती लक्षात ठेवण्यावर भर देतो. त्यातही भारतीय शाळांमधल्या केवळ 14% वर्गांमधून पाठ्यपुस्तकाबाहेरची सामग्री वापरली जाते. त्याचा परिणाम भविष्यात मुलांनी नोकरीसाठी सक्षम ठरण्यावर होतो. एक आकडेवारी असं सांगते, की भारतातल्या पदवीधर अभियंत्यांपैकी 25% पेक्षाही कमी अभियंते नोकरीसाठी सक्षम असतात. 1

वस्तुस्थिती अशी आहे की मुलांना जर संकल्पना खऱ्या अर्थाने समजली तरच तिचा प्रत्यक्ष आयुष्यात कसा वापर करायचा हे त्यांना कळेल, केवळ घोकंपट्टी करुन नव्हे. याचा उपयोग मुलांना काम करतानाही होईल, कारण सृजनशीलता, चिकित्सक विचार आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवणं ही ‘डिजिटल भारतात’ सर्वात जास्त आवश्यक अशी कौशल्यं आहेत.उपाय?

घोकंपट्टीपासून लांब राहणं. यासाठीच आम्ही घोकंपट्टी टाळून शिक्षणाच्या योग्य मार्गाला प्रोत्साहन देण्यासाठी दर वर्षी 10 जून रोजी घोकंपट्टी-विरोधी दिवस साजरा करतो.
आजच्या तंत्रज्ञानावर चालणाऱ्या जगात शिक्षणाचा सुयोग्य मार्ग संगणक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवणं शक्य आहे.

 • ई-पुस्तकं
  सध्याचा पाठ्यपुस्तकांचा आणि नोटसचा आकार पाहूनच विद्यार्थांना धडकी भरु शकते, म्हणूनच छोट्या आकारतली, नेमकी आणि परस्पर संवाद साधू शकणारी ई-पुस्तकं आणि पीडीएफ उपलब्ध करुन देणं महत्वाचं आहे.

 • परस्पर संवाद साधणारी माध्यमं
  दृक-श्राव्य माध्यमं आणि अॅनिमेशन आकर्षक आणि मुलांचं लक्ष गुंतवणारे असतात, त्यामुळे या माध्यमातून शिकलेल्या संकल्पना त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहतात.
 • प्रकल्प आणि सादरीकरण
  एखादी संकल्पन आपल्याला नक्की किती समजली आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येण्यासाठी वैयक्तिक सादरीकरणाचा उपयोग होतो. त्याबरोबरच त्यांचं संवादकौशल्य विकसित करण्यासाठीही त्याची मदत होते.
 • एकमेकांकडून शिकणं
  गूगल डॉक्युमेंटस् आणि व्हर्चुअल वादविवाद या माध्यमातून विद्यार्थी एकमेकांसह काम करत आणि निर्माण करत शिकू शकतात.
 • शंका निरसनाची सत्रं
  प्रश्नमंजुषा आणि प्रतिसादाचे फॉर्म्स या माध्यमांतून विद्यार्थ्याला एखादी संकल्पना किती समजली आहे हे लक्षात येऊ शकतं आणि संबंधित शंकांचं निरसनही होऊ शकतं.
 • निमंत्रितांची व्याख्यानं
  ऑनलाईन शिक्षणाला भौतिक मर्यादा नसल्यामुळे विद्यार्थांना व्हर्च्युअल शिक्षण देण्यासाठी जगातल्या कोणत्याही भागातून निमंत्रित व्याख्याते बोलवणं शक्य असतं.


तुम्ही आजच आमच्या ऑनलाईन शिक्षणाच्या चर्चासत्राच्या माध्यमातून या आकर्षक आणि परस्परसंवादक्षम अशा शिक्षणाची सुरुवात करु शकता.