दिवाळी सुट्टीची अफलातून मार्गदर्शिका: तुमच्या मुलांसाठी ज्ञानरंजनाच्या विविध युक्त्या

 

परीक्षा संपल्या आहेत, मुलांना दिवाळीची सुट्टी लागली आहे आणि आता मुलांना फक्त आणि फक्त धम्माल करायची आहे. अभ्यास-बिभ्यास काहीही नाही. पण इतर अनेक पालकांप्रमाणेच, आपल्या मुलांनी फक्त परीक्षेच्या आधी घाईघाईने अभ्यास पूर्ण करण्याऐवजी मुलांची नियमित अभ्यासाची सवय मोडू नये, यासाठी तुम्ही धडपडत असता.

कॉम्प्युटर सुरू करा.

कॉम्प्युटर ही एक आवश्यक बाब आहे. त्याच्यामुळे सर्व वयातील आणि सर्व स्तरातील मुलांसाठी "शिकणे"ज्ञानदायी तसेच आनंददायी किंवा मनोरंजनात्मक सुद्धा होते. सुट्ट्यांच्या काळात तर, शाळेत शिकलेल्या सगळ्या गोष्टी कॉम्प्युटरवर तपासून बघण्याची, दैनंदिन जीवनाशी त्या विषयाची सुसंगती लावून पाहण्याची आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला अधिकाधिक चालना देण्याची पर्वणीच असते. [1]

तुमच्या मुलांची दिवाळी ज्ञान आणि मनोरंजन यांनी परिपूर्ण करण्यासाठी कॉम्प्युटरवर आधारित काही युक्त्या इथे दिल्या आहेत:

 

1.ऑनलाईन गेमिंग (कॉम्प्युटरवर गेम खेळणे)

कॉम्प्युटरवर गेम खेळणे, म्हणजे "वेळ निरर्थक वाया घालवणे" असे मानले जाते. मात्र काही गेम्स हे खरंच हितकारक असतात. वेबसाईटवरील लर्निंग गेम्समुळे (शैक्षणिक खेळ) मुलांचे इंग्रजी व्याकरण सुधारते, मुले नवीन शब्द शिकतात, तसेच शालेय जीवनात आवश्यक अशा काही वैज्ञानिक संज्ञा, गणितीय संज्ञा आणि इतर महत्त्वाच्या कौशल्यांचा संस्मरणीय आणि रंजनात्मक पद्धतीने परिचय होतो. [2]

 

2. ऑनलाईन स्क्रॅपबुक

हा दिवाळीत करायचा एक मस्त प्रकल्प (प्रोजेक्ट) असतो. हा प्रकल्प करताना मुले दिवसच्यादिवस गुंगून जातात आणि यामुळे मुलाना दिवाळीचा खराखुरा आनंद मिळतो. स्क्रॅपबुकमुळे मुलांना छोट्या छोट्या गोष्टींची नोंद ठेवणे आणि योग्य क्षण टिपण्याचे कौशल्य शिकता येते. त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि एखादया गोष्टीचे सौंदर्यपूर्ण सादरीकरण कसे करावे, हे अनुभवता येते. "कॅन्व्हा" सारखी संकेतस्थळे किंवा प्लॅटफार्म्स, आपल्या आयुष्यातील अशा आठवणी व्यक्तीनुरूप, अत्यंत सौंदर्यपूर्ण रीतीने जतन करून ठेवतात. [3]

 

3. व्हिडिओ तयार करा.

मुलांना व्हिडिओसाठी योग्य कंटेंट रेकॉर्ड कसे करायचे आणि कॉम्प्युटरवर व्हिडिओ तयार कसा करायचा ते शिकवा. यामुळे त्यांना तांत्रिक गोष्टी माहित होतील शिवाय स्टोरी टेलिंगची मुलभूत संकल्पना सुद्धा स्पष्टपणे समजेल आणि तो व्हिडिओ संवादाचे माध्यम म्हणून कसा वापरावा, हेही समजेल.

 

4. छोटे ऑनलाईन कोर्सेस (अभ्यासक्रम)

मुलांना ज्या गोष्टीत सर्वाधिक रस आहे, त्यासंबंधीच्या एखादया छोटया कोर्ससाठी त्यांना ऑनलाईन प्रवेश (साईन अप) घेऊन दयावा. [4] त्यामुळे ते घरात राहूनदेखील दिवसभर चांगल्या गोष्टीत व्यस्त राहतील आणि त्यांच्या छंदांमधून स्वत:चा विकास साधता येईल. यासाठी शाळेतलाच विषय हवा असे मुलीच नाही त्यांना माहिती शोधण्याची इच्छा आहे, असा कोणताही विषय त्यांनी निवडावा.

हा कॉम्प्युटर केवळ दिवाळीच्याच सुट्टीत तुमच्या मुलांचे ज्ञानरंजन करेल असे नाही तर मनोरंजन आणि शिक्षण यांचा समतोल साधण्यासाठी पूर्ण वर्षभर तो त्यांचा सोबती असेल. कारण अर्थातच, २०१७ मधील मुलांच्या हातातील ते पहिलेवहिले लर्निंग गॅजेट असणार आहे![5]