पुढे दिलेल्या सूचनांचा वापर करून तुम्ही पीसी सुरक्षिततेमध्ये कुशल बनू शकाल

 

सेफ्टी फर्स्ट इज सेफ्टी ऑलवेज (सुरक्षेचा विचार आधी केल्यास नेहमीच सुरक्षित रहाता येते.)

- चार्ल्स एम. हेज्

 

तंत्रज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक मोठा भाग बनले आहे. ते उपयुक्त आहे तसेच ज्ञान वाढवणारे आणि आनंददायक देखिल आहे. पण त्याचबरोबर ब्राउजिंग करताना तुम्हाला कितीही सुरक्षित वाटत असेल तरी ते धोकादायक देखिल आहे. पीसी सुरक्षिततेच्या चांगल्या सवयींचे पालन केल्यास तुम्ही स्वतःला तसेच तुमच्या जवळच्या व्यक्तींना नेहमीच सुरक्षित ठेऊ शकता.

 

 पासवर्ड परफेक्ट

 

आपण सर्वांनीच हॅकर्सशी संबंधित अनेक भीतीदायक लेख वाचलेले असतात तसेच अतिशयोक्तीपूर्ण व्हिडियोज् देखिल बघितलेले असतात. ते सर्वच काही खरे असतात असे नाही पण नंतर पश्चात्ताप होण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली चांगली! नाही का? पुढे दिलेल्या गोष्टी करून तुम्ही सुरक्षित राहू शकता :

  • मोठे पासवर्ड वापरा – नेहमी 8 किंवा त्यापेक्षा जास्त कॅरेक्टर्स असलेले पासवर्ड वापरण्याचा सल्ला दिला जातो.
  • पासवर्ड मधील कॅरेक्टर्स नेहमी संमिश्र असावेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या साइट्स साठी वेगवेगळे पासवर्ड्स असावेत.
  • तुमचा पासवर्ड कोणालाही सांगू नका तसेच कुठे लिहूनही ठेऊ नका (विशेषतः तुमच्या मॉनिटरला चिकटवलेल्या पोस्ट-इट नोट वर) दर सहा महिन्यांनी तुमचा पासवर्ड बदला (90 दिवसांनी बदलला तर अधिक चांगले)

 

 जर एखादी मेल संशयास्पद वाटत असेल, तर ती उघडू नका

 

एखाद्या ओळखीच्या ऑनलाइन सर्विस कडून तुम्हाला जर मेल आली आणि त्यात तुमच्या वैयक्तिक माहिती ची खात्री करून घेण्यासाठी लॉगइन करायला सांगितले असेल, तर ती मेल खोटी आहे याची खात्री बाळगा.

सामान्यतः अश्या इमेल्स, तुमच्या इमेल अॅप्लिकेशनच्या स्पॅम फिल्टरमध्ये पकडल्या जातात पण एखादी चुकून इनबॉक्स मध्ये येऊ शकते. जर तुम्ही त्यातील लिंक वर क्लिक केलेत, तर तुमच्या वेब ब्राऊजर ने ते ओळखून ती साइट ब्लॉक केली पाहिजे. तुमच्याकडे योग्य सॉफ्टवेअर असल्यास हे शक्य असते.

 

 बॅकअप ठेवा

 

नियमितपणे तुमच्या पीसी वरील डेटा चा बॅकअप घेत राहिल्याने अचानक माहिती गहाळ होण्याचा धोका टाळता येतो. जर तुम्ही नियमितपणे बॅकअप घेत नसाल, आणि पीसी मध्ये काही समस्या उद्भवली तर तुमचा आयुष्यभर साठवलेला डेटा अचानक गहाळ होऊ शकतो.

तुमच्या उपकरणांच्या तांत्रिक सुरक्षिततेप्रमाणेच, त्यांची भौतिक सुरक्षितताही महत्वाची असते.

  • जर काही काळासाठी तुम्हाला तुमच्या पीसी पासून लांब जायचे असेल, तर त्याला लॉक करा म्हणजे इतर कोणी त्याचा वापर करू शकणार नाहीत.
  • जर तुम्ही फ्लॅश ड्राइव किंवा बाहेरील हार्ड ड्राइव वर तुमची संवेदनशील माहिती साठवत असाल, तर आठवणीने त्यांनाही लॉक करा.
  • डेस्क टॉप कंप्युटर्स वापरत असाल, तर कुठेही जाण्याअगोदर सिस्टम बंद करा किंवा मॉनिटर ची स्क्रीन लॉक करा.

 

आता तुम्ही पीसी च्या सुरक्षिततेच्या बाबतीत कुशल झाला आहात. इंटरनेट वापरताना मुलांना सुरक्षित ठेवण्याचे ज्ञान तुम्हाला मिळाले आहे. हॅप्पी डिजिटल पेरेंटिंग! (डिजिटल पालकत्वासाठी शुभेच्छा)