ऑनलाईन शिक्षणासंबंधी तुमच्या 2021 च्या नववर्षाच्या निश्चयामध्ये अंतर्भूत करण्याजोग्या गोष्टी

 

गेल्या वर्षभरात संपूर्ण जग बदललंय. आज शिक्षण संगणकाच्या पडद्यावरुन होतंय. 2021 या वर्षासाठी आपण संगणक शिक्षणासाठी जबाबदारीनं काही निश्चय केले पाहिजेत.

पुढील काही गोष्टी तुम्ही तुमच्या संगणक शिक्षणाच्या नववर्षाच्या निश्चयामध्ये अंतर्भूत करण्याची गरज आहे.

इंटरनेट सुरक्षेचं भान

पालकांच्या परवानगीशिवाय तुम्ही खासगी आणि संवेदनशील माहिती इंटरनेटवर देणार नाही, याची खातरजमा केली पाहिजे. तुमचा पासवर्ड तुमच्या पालकांशिवाय कुणालाही देऊ नका. सार्वजनिक संगणाकाचा वापर करताना, तुम्ही वापरलेल्या अकांउटसमधून लॉग-आउट करायला विसरु नका.

संगणकासमोर घालवलेल्या वेळाविषयी दक्ष रहा

मनोरंजन आणि शैक्षणिक उद्दीष्टांसाठी तुमचा इंटरनेटरवरचा वेळ व्यतीत करताना आपण किती वेळ ऑनलाईन राहतो याविषयी दक्ष राहणं गरजेचं आहे. तासनतास ऑनलाईन राहू नका.

ऑनलाईन क्लासेसमधून नवी कौशल्यं आत्मसात करा.

2021 साली तुमच्या फायद्यासाठी संगणक शिक्षणाचा वापर करा. ज्या क्लासमधून तुमच्या आवडी आणि प्रतिभेला चालना, तुम्ही नवी कौशल्यं आत्मसात करुन शकाल आणि स्वतःच्या वेळेवर ताबा मिळवू शकाल, अशा क्लासेसमध्ये नाव घाला

ऑनलाईन असताना इतरांशी सौजन्यानं वागा

हल्ली तिरस्कारयुक्त संभाषण आणि कुत्सित शेरेबाजी यांचं इंटरनेटवर वर्चस्व असल्यांच दिसून येतं. कोणत्याही प्रकारच्या तिरस्कारयुक्त संभाषणात सहभागी होऊ नका आणि 2021 हे सर्वांसाठी एक सकारात्मक वर्ष होऊ द्या. प्रेरणादायी आणि प्रोत्साहनपर ट्वीटस, पोस्टस् आणि टिप्पणी यांच्या माध्यमातून इंटरनेटला अधिक सुरक्षित बनवा.

हे वर्षभर या निश्चयांचं नक्की पालन करा आणि इंटरनेटचा शिकण्यासाठी जबाबादारीने वापर करा.