पुढील प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांच्या वापरासाठी यूट्यूब सुरक्षित बनवू शकता

 

YouTube तुमच्या मुलांच्या वापरासाठी योग्य नाही असे मानणा-या हजारो पालकांपैकी तुम्ही देखिल एक आहात का?

हा गैरसमज बदलून, यूट्यूब वर विनामुल्य उपलब्ध असणा-या सर्व उपयुक्त शैक्षणिक स्त्रोतांचा पुरेपुर लाभ घेण्यासाठी पुढे दिलेल्या गोष्टी वाचा. 

1. उपलब्ध असलेल्या सर्व सुरक्षा सेटिंग्ज चा जास्तीत जास्त वापर करा

यूट्यूब हे मुख्यतः प्रौढांच्या वापरासाठी असते. त्यामुळे सेटिंग्ज मध्ये पुढे दिलेले काही बदल केल्यास यूट्यूब तुमच्या मुलांच्या वापरासाठी सुरक्षित बनू शकते. हे बदल करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो.

  • व्हिडिओ पहात असताना "अप नेक्स्ट" हे फीचर (वैशिष्ट्य) डिसेबल करा म्हणजे मुलांच्या समोर अयोग्य व्हिडिओज् स्वतःहून चालू होणार नाहीत.
  • रेस्ट्रिक्टेड (प्रतिबंधित) मोड "ऑन" करा ज्यायोगे इतर स्त्रोतांकडून आलेले अनुचित व्हिडिओज् लपले जातील.

2. फाइन-ट्यून फिल्टर्स

तुमचा पाल्य केवळ शैक्षणिक व्हिडिओज् च पहात आहे हे निश्चित करण्याचा दूसरा उत्तम मार्ग म्हणजे फिल्टर्स ऑप्टिमाइज (अनुकूल) करणे. असे केल्याने केवळ तुम्ही जे शोधत आहात त्याच्याशी संबंधित व्हिडिओज् स्क्रीन वर प्रदर्शित केले जातात, ज्याने वेळ देखिल वाचतो. ते कसे करावे ते पुढे दिले आहे :

  • शोधताना "प्लांट लाइफ सायकल" (वनस्पतींचे जीवनचक्र) यांसारख्या स्पष्ट शब्दांचा वापर करा.
  • शोध घेताना, अपलोड केल्याची तारीख, प्रकार, कालावधी आणि वैशिष्ट्ये यांसारखे फिल्टर्स वापरा.
  • मिळालेल्या रिझल्ट्सचे (निकालांचे) समर्पकता, व्हिडिओ मधील कंटेन्ट (मजकूर) किंवा यूजर रेटिंग्ज यांनुसार वर्गीकरण करा.

3. सबस्क्राइब करा

एखादे चॅनल सबस्क्राइब केल्याने तुम्हाला माहित असते की तुमचा पाल्य जे काही बघेल ते त्याच्या विषयाशी संबंधित असून त्याच्या वयाच्या दृष्टीने सुरक्षित आहे. त्यामुळे निश्चितच सुरक्षिततेचे पालन होते. सगळ्यात चांगले म्हणजे, यूट्यूब च्या वापरावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे निर्बंध आहेत. त्याचप्रमाणे पेरेंट (मुख्य) कंपनी असलेल्या गूगलचे देखिल अंतर्गत नियम कठोर आहेत. या सर्व गोष्टींमुळे कोणतेही चॅनल नियमांचा भंग करू शकत नाही.  

  • तुम्ही किती चॅनल्स सबस्क्राइब करावेत यावर यूट्यूब मध्ये काही मर्यादा नाही. त्यामुळे प्रत्येक विषयाशी संबंधित असे अनेक चॅनल्स तुम्ही सबस्क्राइब करू शकता.
  • तुमच्या मुलांना अभ्यासातून थोडा मोकळा वेळ पाहिजे असेल, तेव्हा त्यांना ऐकण्यासाठी एक संगित आणि मनोरंजनाची प्ले-लिस्ट तयार करून ठेवा

डिजिटल पेरेंटिंगमध्ये लहान लहान गोष्टींची माहिती देखिल मदत करते. त्यामुळे तुमच्या मित्रमंडळींमध्ये ही माहिती सांगा जेणेकरून त्यांची देखिल मुले शाळेतील अभ्यासासाठी यूट्यूब चा वापर करू शकतील.