तुम्ही सदस्यत्व घ्यावे असे तीन आफ्टर स्कूल क्लब (शाळेनंतरचे मंडळ)

 

जर तुम्ही मोठ्या माणसांना शाळेबद्दल सल्ला विचारायला गेलात तर हमखास ते तुम्हाला अभ्यासाकडे गांभिर्याने पहावे आणि अभ्यासाव्यतिरिक्त किमान एक तरी छंद मनापासून जोपासावा असेच सांगतील. तुम्ही जेव्हा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अर्ज भराल, तेव्हा तर तुम्हाला या छंदाचा फायदा अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून होइलच त्याशिवाय रोज दमून घरी आल्यानंतर स्वतःचे मन शांत करण्यासाठी देखिल त्याचा फायदा होईल.

जर तुमच्या शाळेत पुढील गोष्टी उपलब्ध नसतील, तर तुम्ही पुढे दिलेल्या तीन आफ्टर स्कूल क्लबचे सभासद बनू शकता.

1. कोडिंग : ऑनलाइन काहीही करायचे असेल तर त्याचा पाया

भारताबाहेर इतर देशांमध्ये, प्रत्येक तीन मुलांमधील एक मूल वयाची 15 वर्षे पूर्ण करण्याअगोदरच कोड करण्यास शिकते. भारतात मात्र प्रत्येक 10 मुलांतील एकच मूल हे शिकते. Scratch, Code आणि Codecademy यांसारख्या वेबसाइट्सच्या मदतीने तुम्ही शाळेनंतर कोडिंग शिकून इतर मुलांच्या पुढे जाऊ शकता. तुम्हाला यासाठी फक्त एक पीसी आणि वायफाय ची गरज भासते.

2. कला : तुमच्यातील सृजनकौशल्य जगाला दाखवणे

“प्रत्येक मूल हे एक कलाकार असते, मोठे झाल्यावर देखिल तुमच्यातील तो कलाकार जपून ठेवणे हेच कठीण असते” – पाब्लो पिकासो
तैलचित्रे रंगवणे किंवा हाताने चित्रे काढणे तुम्हाला जमत नसेल, तर आर्ट क्लब मधील आर्ट डिजिटली वापरून पहा. सुरूवातीला तुम्ही Sketch, YouiDraw आणि Pixilart सारखे काही डिजिटल प्लॅटफॉर्म्स वापरून पहा. तुमच्या पीसी मध्ये याव्यतिरिक्तही अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. आर्ट क्लब चा सर्वात मोठा फायदा म्हणजे घरी जाताना तुम्हाला ताजेतवाने तर वाटत असेलच शिवाय काहीतरी मिळवल्याचे समाधान देखिल असेल.

3. संगित : संयम वाढविण्यासाठी तुमच्या मेंदूला प्रशिक्षण

अभ्यास असो, खेळ असो, सामाजिक जीवन असो किंवा घरात असताना, संयम किंवा सहनशीलता हा सद्गुण तुम्हाला आयुष्यात नेहमीच उपयोगी पडतो. गाणी लिहिणे, एखादे वाद्य वाजविणे किंवा गाणे यापैकी काहीही करून संगित क्षेत्रात प्राविण्य मिळवल्यास तुमचा संयम नक्कीच वाढतो. जितका जास्त सराव कराल तितका संयम वाढत जाईल. यूट्यूब वरील व्हिडिओज् पाहून तुम्ही तुमच्या आवडीचे एखादे वाद्य वाजवायला शिकू शकता तसेच तुमच्या आफ्टर स्कूल क्लब मध्ये LMMS वापरून संगित तयार देखिल करू शकता.

कुणी सांगावे, पुढे जाऊन तुम्ही कदाचित यापैकीच काहीतरी तुमचे करियर (कारकीर्द) म्हणून निवडाल.

पुन्हा एकदा : तुमच्या शैक्षणिक वर्षातील उज्ज्वल यशासाठी घरी आणि शाळेत असे दोन्हीकडे तुमच्या पीसीचा पुरेपूर वापर करून घ्या.