या तीन बाळ यू-ट्यूब यूजर्सचे (वापरकर्ते) नक्की अनुकरण करा

 

“तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये खूप रस आहे, अशा कोणत्याही गोष्टींविषयीचा कंटेंट (माहिती/तपशिल) तयार करता येणे म्हणजे यू-ट्यूबचा आनंद घेता येणे.”
- -अनामिक

 

तुम्हाला यू-ट्यूब खूप आवडतं, हो ना? तुम्ही जिथे जाता तिथे ते असतंच. कधी तुम्ही गाणी ऐकता, कधी मजेशीर व्हिडिओ बघता किंवा कधी अभ्यास पूर्ण करायला सुद्धा उपयोग होतो.

एका कॅमेऱ्याच्या मागे उभे राहून एखाधी व्यक्ती आपली शक्कल लढवून मेहनतीने असे व्हिडिओ तयार करते आणि घरबसल्या पीसीच्या मदतीने अनेकजणांना त्यापासून प्रेरणा मिळत राहते. अशाप्रकारे यू-ट्यूबर्स एक साधा विचार कृतीत उतरवतात आणि प्रसिद्ध होतात. तुमच्यासाठी ही काही प्रेरणा देणारी उदाहरणे:

 

1. अमरबरोबर शिका 

अमर थोगिती, जगभरातील वयाने लहान आणि सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या यू-ट्यूबर्सपैकी हा एक भारतीय कुमार. हा भूगोलाचे धडे अत्यंत मनोरंजक आणि संवादात्मक पद्धतीने शिकवतो. शिकवण्यापेक्षा तो आपल्याशी संवाद साधतो आहे, असे वाटते. २०१६ मध्ये त्याने त्याचे “Learn with Amar” हे यू-ट्यूब चॅनेल सुरू केले. त्यावेळी तो फक्त १० वर्षांचा होता.
त्याच्या यू-ट्यूब चॅनेलचे सध्याचे फॉलोअर्स - 281,021

2. कायरास्कोप टॉय रिव्ह्यूज 

Kyrascope Toy Reviews हे २०१६ मध्ये कायरा नावाच्या एका सात वर्षाच्या मुलीने सुरु केलेले यू-ट्यूब चॅनेल आहे. तिच्या चॅनेलवर खेळण्यांबद्दलच्या प्रतिक्रिया (रिव्ह्यू), त्याच्याशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टी, काही प्रेरणादायी संदेश आणि कुटुंबाबरोबरचे काही मजेशीर प्रसंग - मुळात हे चॅनेल म्हणजे एक ‘ज्ञानरंजन’ करणारे पॅकेज आहे. 

तिच्या यू-ट्यूब चॅनेलचे सध्याचे फॉलोअर्स - 11,622

 

3. टेक रिव्ह्यूअर रोनित सिंघ 

रोनित सिंघ हा १४ वर्षांचा मुलगा भारतातील सर्वात लहान टेक यू-टयूबर्सपैकी एक आहे. त्याने २०१५ साली त्याचे चॅनेल सुरू केले. त्याच्याकडे असलेली स्वत:ची गॅजेट्स उघडून तो त्यांचे निरीक्षण करून रिव्ह्यू किंवा त्याची मते व्हिडिओमधून सांगतो. या रिव्ह्यूमुळे सर्वाना तांत्रिक रित्या या खेळण्यांबद्दल एक वेगळाच दृष्टीकोन मिळतो.

त्याच्या यू-ट्यूब चॅनेलचे सध्याचे फॉलोअर्स- 2637

ह्या वेगळं काम करणाऱ्या मुलांविषयी तुम्ही आत्ताच वाचलंत, ही सगळी मुलं तुमच्यासारखीच आहेत. मग आता तुम्हाला पण काहीतरी वेगळं करून दाखवण्याची इच्छा झाली आहे ना?

टीप - यू-ट्यूब हे फक्त हिमनगाच्या एका टोकाएवढं आहे.

तुमचा पीसी (कॉम्प्युटर) म्हणजे तुमचं आवडतं खेळणं असू शकतं, तुमची लायब्ररी (वाचनालय) असू शकतो आणि सर्व गोष्टी एकातच सामावल्या आहेत असा एका क्लिकवर उपलब्ध असलेलं मनोरंजन सुद्धा असू शकतं. तुमच्या घरी पीसी असेल तर तुम्हाला स्वत:ची काहीतरी निर्मिती करण्याची संधी मिळते आणि लायब्ररीतल्या पुस्तकांमधून मिळणाऱ्या ज्ञान किंवा माहितीपेक्षाही जास्त माहिती आणि ज्ञान मिळू शकते.