मुलांना आवडणारे मेकरस्पेस चे तीन प्रोजेक्ट्स

 

मेकरस्पेस एक अशी जागा आहे जेथे मुले विविध साधने आणि साहित्य वापरून विविध गोष्टी तयार करू शकतात, शोध लावू शकतात, विविध गोष्टींबद्दल माहिती जाणून घेऊ शकतात. [1] येथे मुले शाळेत शिकलेल्या संकल्पना वापरून पाहू शकतात शिवाय नविन संकल्पना देखिल शिकू शकतात. मेकरस्पेस मध्ये ठराविक असा अभ्यासक्रम नसल्यामुळे मुले स्वतः गोष्टी तयार करून त्यातून शिकू शकतात.

मेकरस्पेस मध्ये सहभागी झाल्यानंतर तुमचा पाल्य काय काय शिकू शकेल याची कल्पना तुम्हाला पुढील तीन मेकरस्पेस प्रोजेक्ट्स पाहून येईल.

1. 4-चाकी फुग्याची कार

 

मुलांसाठी हा प्रोजेक्ट मजेदार तर आहेच शिवाय त्यातून शिकायलाही मिळेल. गती, बल, घर्षण आणि वेग यांसारख्या भौतिकशास्त्रातील महत्वाच्या परिभाषा ज्या मुले केवळ पुस्तकात वाचतात त्या येथे फुगे, स्ट्रॉ, बाटल्या आणि टेप यांच्या सहाय्याने मूर्त स्वरूपात उतरतात. केवळ तेवढेच नाही तर प्रोजेक्टसाठी मुले घरातील जुन्या वस्तू परत वापरतात ज्याने मुलांना त्यांच्या निर्णयांचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून येतो.

2. संयोजक म्हणून लीगो चा वापर

 

लीगो हे मेकरस्पेस मधील अष्टपैलू साधन आहे ज्याचा वापर अनेक गोष्टी बनविण्यासाठी केला जातो. तुमचा पाल्य विविध आकाराच्या सपाट तुकड्यांना एकत्र जोडून खण बनवून त्यात स्टेशनरी, नाणी, गोट्या, चार्जिंग केबल्स इत्यादी वस्तू ठेवण्यासाठी ऑर्गनायजर बनवू शकेल. यातून मुलांना आकार, मिती, अवकाश यांसारख्या भूमिती मधील मूलभूत संकल्पना समजतात.

3. सुवाहक (कंडक्टिव) शुभेच्छा पत्रे

शाळेत शिकविलेल्या भौतिकशास्त्राच्या पाठांचा स्वतः केलेल्या प्रयोगांतून अनुभव घेतल्याने मुलांना संकल्पना चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत मिळते. कंडक्टिव (विद्युत सुवाहक) शुभेच्छापत्र बनविताना मुलांना पालक किंवा निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पॉवर एफिशिएन्सी, इलेक्ट्रिकल युनिट्स आणि इलेक्ट्रिकल वोल्टेज सारख्या संकल्पना शिकून त्यांच्या मागचे सिद्धांत प्रयोगातून बघता येतात. या प्रोजेक्टमुळे मुले विद्युत पुरवठ्याजवळ वावरताना सावध राहायला शिकतात त्याचबरोबर काही खास कार्यक्रमांच्या वेळी त्यांना नविन प्रयोग करून बघण्याची संधी मिळते.

प्रत्येक मेकरस्पेस प्रोजेक्ट मध्ये तुमच्या पाल्याला शिकण्यासाठी काहीतरी नविन गोष्टी असतात. प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर जे समाधान मुलांना मिळते त्याची तुलना दुस-या कशाशीही होऊ शकत नाही. प्रत्येक प्रोजेक्ट झाल्यानंतर पुढे शिकत राहण्यासाठी मुले दूसरा प्रोजेक्ट करण्यासाठी आत्मविश्वासाने तयार होतात. मेकरस्पेस म्हणजे भविष्यातील ग्रंथालय असून मेकर माइंडसेट निर्माण करण्याने तुमच्या पाल्यामध्ये भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित होतील.

तुमच्या पाल्याने मेकरस्पेस प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला का? त्यांच्या सृजनशीलतेबद्दल आम्हाला #DellAarambh चा वापर करून Twitter वर माहिती द्या.