पीसी स्वच्छ करताना टाळाव्यात अश्या 3 चूका

जरा विचार करा. तुम्ही तुमचा पीसी घरी रोज वापरता किंवा सोमवार ते शुक्रवार शाळेत वापरता. तसेच तुमच्या पैकी काही जणांकडे घरी तर पीसी असतोच शिवाय शाळेत देखिल वापरला जातो. आता जरा त्या घाणीबद्दल आणि कारण नसताना वर्षानुवर्षे साठून राहिलेल्या डेटाबद्दल विचार करा...

तुम्हाला तो साफ करायची इच्छा आहे का?

तुमचा पीसी साफ करत असताना तुम्ही ज्या तीन चुका टाळल्या पाहिजेत, त्या पुढे दिल्या आहेत:

1. पुरेसे डिलिट न करणे

तुमच्या इ-मेल्स पासून सुरूवात करा. अनसबस्क्राइब बटण वर क्लिक करा आणि तुमच्या सर्व जंक मेल्स सुद्धा डिलिट करा. नंतर, तुमचे ब्राउजर मध्ये सेव केलेले बुकमार्क्स तपासा आणि तुम्हाला खरोखर ज्यांची गरज आहे तेवढेच बुकमार्क्स ठेवा. सर्वात शेवटी पीसी वरील प्रत्येक फोल्डर उघडून तपासा आणि जे काही डुप्लिकेट असेल, जुने असेल किंवा तुम्हाला आता गरजेचे नसेल ते सर्व डिलिट करा. ते सर्व झाल्यानंतर तुमचा रिसाइकल बीन रिकामा करायला विसरू नका.

2. पुरेसा व्यवस्थितपणा नसणे

आपण सर्व जण वेगवेगळे प्रमाणात व्यवस्थितपणा ठेवतो. काही जण सर्व डेटा डाऊनलोड फोल्डर मध्ये ठेवतात, तर काही जण विषय, मुल्यांकन यांच्या अनुसार फोल्डर बनवून त्यात डेटा ठेवतात. तर काही जण यांच्या मधल्या श्रेणीतले असतात, म्हणजे सुरूवात तर करतात पण रोजच्या कामांमध्ये इतके व्यस्त होऊन जातात की व्यवस्थितपणासाठी त्यांना वेळच मिळत नाही. यावर एक सोपा तसेच परिणामकारक उपाय म्हणजे, अशी व्यवस्था करणे ज्यामुळे फाइल्स डुप्लिकेट बनणार नाहीत आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे ते लगेच मिळेल. तुमच्या डाऊनलोड्स मध्ये जा आणि पुढील विकल्प चालू करा - “आस्क व्हेअर टू सेव इच फाइल बिफोर डाऊनलोडिंग”.

 
3. डिफ्रॅगिंग न करणे
 
तुमच्या हार्ड ड्राइव वर सेव केलेल्या फाइल्स काही काळाने फ्रॅगमेंट्स म्हणजेच लहान तुकड्यांमध्ये विभाजित होतात आणि जास्त जागा घेतात. त्याचा परिणाम म्हणून तुमच्या पीसी चा वेग कमी होतो. विंडोज डिस्क फ्रॅगमेंटर चा वापर करून डिफ्रॅगिंग केल्यास, तुमचा पीसी आतून खूप चांगला स्वच्छ होतो. तुम्ही तुमचा डेटा चा बॅकअप घ्या मग कंट्रोल पॅनल मधील डिफ्रॅग प्रोग्राम उघडा आणि डिफ्रॅग वर क्लिक करा. तुमच्या पीसी मध्ये किती डेटा आहे त्याच्या अनुसार या कामाला काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत वेळ लागू शकतो.
 
सर्वात शेवटी, एखाद्या विश्वासार्ह स्क्रीन क्लिनर सोल्यूशनच्या मदतीने तुमचा पीसी बाहेरून स्वच्छ करा. तसेच ब्रश किंवा स्टिकी नोट वापरून तुमच्या पीसी च्या की-बोर्ड वरील धूळ साफ करा.
 
हॅप्पी क्लिनिंग!