प्रत्येक डिजिटल पालकाने 2018 मध्ये कराव्यात अशा तीन गोष्टी

 

आपल्या मागच्या पिढीत, कंप्युटर ही अशी गोष्ट होती जी फार कमी लोक वापरत. परंतु आता मात्र दिवसातील थोडा देखिल वेळ असा जात नाही जेव्हा तुम्ही एखाद्या स्क्रीन कडे पहात नसाल, मग तो तुमचा फोन असो, टॅबलेट असो किंवा पीसी असो. म्हणूनच प्रत्येक पालकाने जागृत राहून स्वतःच्या मुलांना भविष्यात योग्य मार्गावर नेण्यासाठी आवश्यक अश्या गोष्टी केल्या पाहिजेत.

प्रत्येक डिजिटल पालकाने 2018 मध्ये कराव्यात अशा तीन गोष्टी :

1. एकत्र बसून उपाय शोधा

सोशल मिडिया बद्दल तुमच्या मनात संभ्रम आहे का? किंवा तुम्हाला निवडक बातम्याच वाचण्याची इच्छा आहे का? एकत्र बसून या गोष्टी समजून घेणे हा तुमच्या लहानग्यांबरोबर संबंध दृढ करण्याचा आणि त्याच वेळेस नविन गोष्टी शिकण्याचा उत्तम उपाय आहे. याचा अजून एक फायदा म्हणजे, पीसी वापरणे हे सामान्य कौटुंबिक कार्य आहे असे तुमच्या मुलांना पटेल आणि काही अडचण आल्यास तुम्हाला प्रश्न विचारण्यास ती कचरणार नाहीत.

2. गेट सोशल (सोशल मिडियाचा वापर शिका)

एकत्र बसून पीसी चा वापर कसा करावा ते शिकताना सोशल बनणे एक महत्वाचा मुद्दा बनते. तुमची मुले सोशल मिडियावर काय करतात यावर तुम्ही सतत लक्ष ठेवलेले त्यांना आवडणार नाही पण नविन चित्रपट, सोषल मिडियावरील मित्र, व्हिडिओ क्लिप्स, नविन फॅशन इत्यादी संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांना नक्कीच आवडेल आणि तुमची मुले मोकळ्या मनाने तुमच्याशी संवाद साधू लागतील.

3. अपग्रेड, अपग्रेड आणि अपग्रेड (अद्यावत करा)

अशी कल्पना करा, तुमच्या पाल्याने आठवडाभर कष्ट करून, भौतिकशास्त्राचे प्रेझेंटेशन (सादरीकरण) तयार केले आहे आणि नेमके ते सेव करायच्या वेळी तुमचा पीसी बिघडला.

तुमच्या मुलांसाठी यापेक्षा जास्त मन खच्ची करणारी घटना कोणती असू शकेल?

अशा सोडविता येण्यासारख्या समस्यांवरचा सोपा उपाय म्हणजे, जेव्हा जेव्हा शक्य असेल आणि गरज भासेल तेव्हा ऑपरेटिंग सिस्टम, पीसी आणि शैक्षणिक स्त्रोत सर्व अद्यावत करून घ्यावेत. शेवटी काय तर प्रिवेंशन इज बेटर दॅन क्योर! (काळजी घेणे, उपचार करून घेण्यापेक्षा नेहमीच चांगले असते).

जर तुम्ही उशीरा सुरूवात केलीत, तर तुमचे काम संपायला देखिल उशीरच होणार. तुमच्या मुलांसाठी काय योग्य आहे आणि काय नाही त्याचा विचार करून लवकरात लवकर पीसी घरी आणा. कोणता पीसी विकत घ्यायचा, कोणते सॉफ्टवेयर इन्स्टॉल करायचे किंवा अभ्यासासाठी कोणते स्त्रोत वापरायचे हे ठरवून मगच खरेदीला जा. इतर पालकांना विचारा, पालकसभेच्या वेळी शिक्षकांशी तपशीलवार चर्चा करा, ऑनलाइन शोध घ्या आणि पीसी फॉर एज्युकेशन (शिक्षणासाठी पीसी) च्या क्षेत्रातील अद्यावत माहिती तुम्हाला मिळाल्याची खात्री झाल्यावर पीसी खरेदी करा.

डिजिटल पालकत्वासाठी शुभेच्छा!