डिजिटल लर्निंग डे ला प्रत्येक शिक्षिकेने पुढील तीन गोष्टी कराव्यात

 

अनेक वर्गांमध्ये शिकवणे असो, मध्यरात्रीपर्यंत जागून प्रश्नपत्रिका तपासणे असो, किंवा गोंधळ करणा-या विद्यार्थ्यांचा वर्ग सांभाळणे असो शिक्षक बनणे हे अजिबात सोपे नाही. 2012 पासून दरवर्षी 22 फेब्रुवारीला साजरा केला जाणारा डिजिटल लर्निंग डे हा अशाच सर्व कष्टाळू शिक्षकांना समर्पित केलेला आहे ज्यांनी गेल्या काही वर्षांत अत्यंत चर्चिल्या गेलेल्या शिक्षणपद्धतीला म्हणजेच डिजिटल लर्निंग [1] ला आपलेसे केले आहे. शिकवताना पीसी चा वापर करण्यास मिळाल्याने त्यातील जाणकार शिक्षकांसमोर जणू संधीचे जगच उघडले गेले आहे. डिजिटल लर्निंग डे ला प्रत्येक शिक्षकाने कराव्यात अशा तीन गोष्टी पुढे दिल्या आहेत :

1) काहीतरी नविन शोधायचा प्रयत्न करा

प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते की ते शिकवताना त्यांच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण एकाग्रतेने लक्ष द्यावे आणि ज्ञान संपादन करावे. या डिजिटल लर्निंग डे ला रोजचे वेळापत्रक बदला. वर्गात शिकवताना एखादा व्हिडिओ, नविन वेबसाइट किंवा एखादा खेळ, अशाप्रकारचे काहीतरी नविन तंत्र वापरल्यास वर्गातील सर्वात मस्तीखोर मुले देखिल आवडीने लक्ष देऊन शिकू लागतील.

2) तुमच्या पीसी च्या ब्राऊजर वर उत्तम स्त्रोत बुकमार्क करा (खूण ठेवा)

बुकमार्क करण्याआधी, तुम्हाला तुमच्या वापरण्यायोग्य स्त्रोत शोधून त्यांची तपासणी करावी लागेल. जर वेळ शिल्लक असेल, तर तुम्ही एकापेक्षा जास्त स्त्रोत देखिल बुकमार्क करू शकता. स्त्रोतांची तपासणी करणे अत्यंत महत्वाचे असते. असा विचार करा, की तुम्ही बुकमार्क केलेली एखादी वेबसाइट वर्गात पहिल्यांदाच उघडली आहे आणि त्यावर "तुमच्या देशात उपलब्ध नाही" असे दर्शवले गेले, तर तुमच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया काय असेल याची कल्पना करून पहा!

3) दुस-या एखाद्या शिक्षकाचे मेंटॉर (मार्गदर्शक) बना

दुस-या एखाद्या शिक्षकाचे मार्गदर्शन करण्यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे, तुम्ही नेहमी सर्वोत्तम बनायच्या प्रयत्नात रहाल. याचे कारण म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीचे मार्गदर्शक असाल, त्या व्यक्तीला सतत चांगले ज्ञान देत रहाण्याचा तुमचा उद्देश असेल. तुमच्या शाळेतील किंवा परिसरातील, तुमच्यापेक्षा लहान शिक्षकाचे मार्गदर्शक बनणे हे तुमची व्यावसायिक प्रगती होण्यात देखिल महत्वाची भूमिका बजावते.

दैनंदिन किराणा खरेदी पासून ते बँकिंग पर्यंत प्रत्येक गोष्टीत आता तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, असे असताना शाळेसाठी त्याचा परिणामकारक रीतीने वापर करणे देखिल अत्यंत महत्वाचे आहे. शाळेत कंप्युटरचा वापर करणे याचे उद्देश्य, आजच्या विद्यार्थ्यांना उद्याचे यशस्वी नागरिक बनण्यास मदत करणे इतकेच नसून, शिक्षकांना देखिल प्रत्येक गोष्टीत प्राविण्य मिळवून, याचा फायदा स्वतःचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी करता येऊ शकतो. हॅप्पी डिजिटल लर्निंग डे! (डिजिटल लर्निंग डे च्या शुभेच्छा.)