या वर्ल्ड बॅकअप दिनानिमित्त पुढील तीन गोष्टी करा

 

तुमच्या प्राचार्यांनी मागितलेला एक महत्वाचा अहवाल तुम्ही आठवडा अखेरीला बसून नीट तयार केलात. सोमवारी सकाळी तुम्हाला इमेल करून तो अहवाल पाठवायचा आहे.

आता अशी कल्पना करा.

तुम्ही तो अहवाल पाठवणार इतक्यात तुमच्या पीसी ची स्क्रीन फ्रीज झाली (गोठली) आणि तुमची फाइल गहाळ झाली. हे किती निराशाजनक आहे नाही का?

सुदैवाने, त्याच्यावर उपाय आहे.

सर्व फाइल्स चा बॅकअप घेऊन ठेवणे

या वर्ल्ड बॅकअप दिनापासून सुरूवात करून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता :

3-2-1 बॅकअप धोरण

3-2-1 हे काय आहे असा विचार करत असाल ना? याचा अर्थ अगदीच साधा आहे, तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या डेटा च्या नेहमीच तीन प्रती बनवून ठेवाव्यात. एक प्रत घरी असावी आणि एक शाळेत. तीसरी प्रत नेहमीच क्लाउड स्टोरेजचा वापर करून ऑनलाइन स्टोर केलेली असावी. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज् बॅकअप सारखी साधने ही वापरण्यास सोपी असतात आणि तुम्हाला शिकविताना लागणा-या सर्व फाइल्स साठवून ठेवण्यासाठी त्यांची क्षमता असते.

वेळापत्रक ठरवून वारंवार बॅकअप घेत रहा

तुम्ही डेटा केवळ वर्ल्ड बॅकअप दिनालाच सेव न करता नियमितपणे त्याच्या प्रती बनवत राहिलात तर तुमची कोणतीही फाइल कधीही गहाळ होणार नाही. आठवण राहण्यासाठी रिमाइंडर लावा (स्मरणपत्र) किंवा इतर शिक्षकांच्या सोबतीने ठरलेल्या दिवशी बॅकअप घेण्याची योजना बनवा. एकत्रितपणे काम केले तर त्याचा फायदा सर्वांनाच होतो.

तुमचे बॅकअप्स मालवेअर पासून सुरक्षित ठेवा

तुमच्या महत्वाच्या फाइल्स सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्या पीसीचा नियमितपणे बॅकअप घेत रहाणे इतकेच पुरेसे नाही. कधीकधी वायरसेस आणि मालवेअर्स तुमच्या बॅकअप वर हल्ला करू शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यात घेतलेल्या तुमच्या श्रमांवर पाणी फेरले जाते तसेच तुमची व्यावसायिक प्रगती होण्यात देखिल अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आठवड्यातून किमान एकदा तरी तुमच्या डेटाची अँटीवायरस सॉफ्टवेअरद्वारे तपासणी करून घेत जा.

शिक्षक बनणे हे अतिशय कठीण असते यात काही वाद नाही. त्यासाठी तुमच्याकडे भरपूर संयम असावा लागतो तसेच तुमची भरपूर तयारीही असावी लागते. सतत शिकवत राहिल्याने तुमचा संयम वाढत जातो हे जरी खरे असले, तरी प्रत्येक तासाच्या आधी तयारी करणे खूप कष्टाचे असते. येथेच पीसी तुमच्या मदतीला येतो. प्रत्येक तासामध्ये विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने काय शिकवता येईल त्याची योजना बनविण्यात पीसी ची मदत मिळते. फरक जाणून घेण्यासाठी एकदा वापर करून पहाच!