तुमच्या विद्यार्थ्यांना आवडतील अशा तीन व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप्स

 

संपूर्ण वर्गाच्या सहभागाइतका कोणत्याही शिक्षिकेला जास्त आनंद कशातच नसतो - असा सहभाग ज्यामध्ये बहुतेक विद्यार्थी मनापासून ऐकत आहेत आणि ती शिकवत असलेल्या विषयाच्या संदर्भात प्रश्न विचारत आहेत. खरं पाहता, अशा प्रकारचे पाठ तयार करणे कठिण असते खास करून तुम्ही जेव्हा जेवणाच्या सुटीनंतर लगेच किंवा शाळेच्या मोठ्या सुटीच्या अगोदर एखादा पिरियड घेत असाल तर ते जास्त कठिण असते.

व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप्समध्ये प्रवेश करा.

पीसीवर तुम्ही विद्यार्थ्यांना असे ठिकाण दाखवू शकता जेथे ते कधीच गेले नव्हते आणि ते सुद्धा वर्गात आरामशीर बसून दाखवू शकता. ह्या पाठामुळे तुमचा वर्ग उत्साहित होईल आणि अनेक प्रश्न विचारेल इतकेच नव्हे तर त्यांना तो विषय सहज समजेल. त्यासाठी एका पाठोपाठ एक धडे गिरविण्याची गरज नाही!

याठिकाणी तीन व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप्सची माहिती देण्यात आली आहे ज्याची तुम्ही सुरूवात करू शकता - फक्त तुमच्यापाशी पीसी असेल याची काळजी घ्या.

१) डिस्कव्हरी एज्युकेशन

विषय, श्रेणी आणि संकल्पना यानुसार विभागणी करून - डिस्कव्हरी एज्युकेशन हा तुमच्या विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याचा उपक्रम होऊ शकतो. ह्या संकल्पनेत पृथ्वी आणि अंतराव विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास आणि अशा अनेक विषयांचा समावेश असू शकतो, आणि त्यात अगदी ताज्या आणि खूप महत्त्वाच्या फुटेजचा समावेश असू शकतो. उदाहरणार्थ, टुंड्रा व्हर्च्युअल अनुभवात दर वर्षी होणारे ध्रुवावरील अस्वलांचे अतिशय सुंदर आणि अप्रतिम पद्धतीने होणारे स्थलांतर, ज्यामुळे अगदी प्रत्यक्ष जग तुमच्या वर्गात अवतरू शकते.

 

२) गुगल अर्थ

शिक्षकाचा स्वर्ग, गुगल अर्थचा उपयोग करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण जगातील दूरवरची ठिकाणे दाखवा आणि खास तयार केलेल्या पाठांचा सर्वाधिक उपयोग करून घ्या. संपूर्ण जग अक्षरशः तुमच्या पीसीच्या ब्राऊजरवर आहे. अॅन्टिगा, ग्वाटेमालामधील फुलांपासून ते फ्लोरेन्स, इटली मधील आतषबाजी, तुमच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण जगातील जे काही पहायचे आहे ते दाखवा.

 

३) झूम अर्थ

झूम अर्थ च्या ग्लोबल लाईव सॅटेलाईट फिड माध्यमातून तुमचे विद्यार्थी वरून जग अगदी प्रत्यक्षात पाहू शकतील. ह्यामध्ये ‘‘लोकेट मी’’ नावाचे एक वैशिष्ट्य आहे ज्याचा तुम्ही स्थानिक इतिहास, शहरातील खास हवामान किंवा सामाजिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी उपयोग करू शकता. वर्गाला हवे तसे स्वतः माहिती मिळवू द्या आणि शेवटी एकमेकांनी काय शिकले ह्याची देवाणघेवाण करण्यासाठी गटचर्चा करू द्या.

सर्वप्रथम, तुम्हाला असे वाटेल की हे अभ्यासक्रमाबाहेरचे आहे परंतु, पाठाचे योग्य नियोजन केल्यास, तुमच्या विद्यार्थ्यांना अजून शिकण्याची इच्छा असेल!