पीसीचा वापर करून तुमच्या विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकण्यास मदत करण्याचे तीन मार्ग

 

दैनंदिन शाळेत जाणे आणि घरी परत येणे

संपूर्ण दिवस क्लासेस (अभ्यास)

अभ्यासेतर उपक्रम

शिकवण्या

गट प्रकल्प

गृहपाठ

मध्येच थोडासा वेळ खेळण्यासाठी

आणि नंतर सर्वात शेवटी स्वतःहून करायचा अभ्यास

शाळेच्या दिवसांमध्ये तुमचे हेच वेळापत्रक ठरलेले असते...

स्वतःहून केलेला अभ्यास हा अतिशय महत्वाचा असून देखिल त्यासाठी अत्यंत कमी वेळ दिला जातो. यासाठी दिवसाच्या शेवटी थोडासा वेळ ठरवून ठेवलेला असतो त्यातही मुले दिवसभर दमलेली असल्यामुळे स्वतःचा अभ्यास करायची त्यांना इच्छाच होत नाही.

अश्यावेळी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही काय कराल?

1. त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी शोधू देणे

वर्गातील तासाच्या शेवटी मुलांना विचारा की आत्ताच शिकवलेल्या गोष्टींपैकी त्यांना कशात जास्त रूची वाटते.
त्यांना ज्या विषयात रूची वाटते त्याबद्दल अधिक माहिती शोधून काढण्याचा गृहपाठ त्यांना द्या त्यामुळे त्यांना त्या विषयाचे जास्त ज्ञान मिळेल. सर्व वयोगटांसाठी आणि सर्व विषयांसाठी हे करता येईल. तसेच तुमच्या विद्यार्थ्यांना Wikipedia, Quora आणि Google Scholar चा जास्तीत जास्त वापर करून सखोल ज्ञान मिळविण्यासाठी आणि पुढच्या तासाला ते वर्गात सादर करण्यासाठी प्रोत्साहित करा.

2. डू इट यॉरसेल्फ (स्वतः करून पहा) चे प्रकल्प अभ्यासात समाविष्ट करणे

Instructables मध्ये विविध प्रकल्प दिलेले असतात ज्यांचा वापर करून विद्यार्थी स्वतः प्रयोग करू शकतात आणि वर्गात शिकवलेल्या संकल्पनांना दैनंदिन जीवनात वापरून स्वतःचे ज्ञान पक्के करू शकतात. विद्यार्थी जे शिकत आहेत त्याबद्दल निबंध लिहून किंवा व्हिडिओ बनवून किंवा त्याचे वर्गात सादरीकरण करून दाखवायला सांगा. त्याचा फायदा म्हणजे ते नक्की काय शिकत आहेत याबद्दल तुम्हाला माहिती असेल. आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आले असेलच की स्वतःचा अभ्यास आणि गृहपाठ दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत. गृहपाठ जितका वैविध्यपूर्ण असेल, तितका विद्यार्थी तो आवडीने करतील आणि त्यांना त्या विषयात रूची निर्माण होईल.

3. माइंड मॅपिंग ला उत्तेजन देणे

माइंड मॅपिंग प्रक्रिया ही एखाद्या मुख्य सिद्धांतापासून किंवा कल्पनेपासून सुरू होते आणि त्यानंतर तीला विविध कल्पना आणि विचारांचे फाटे फुटतात. या पद्धतीने अभ्यास केल्यास तुमच्या विद्यार्थ्यांना वर्गात शिकवलेली एखादी जटील संकल्पना घरी जाऊन समजण्यास सहज शक्य होईल. वापरण्यास सोपे असे डिजिटल माइंड मॅप्स बनविण्यासाठी तुमच्या विद्यार्थ्यांना घरी MindMeister आणि Mindmaple वापरून प्रयोग करू द्या आणि तयार केलेले मॅप्स वर्गात मित्रांबरोबर वाटू द्या. विद्यार्थ्यांना यात गुंतवून सखोल माहिती मिळविण्यास प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही याची स्पर्धा देखिल ठेवू शकता.

घोकंपट्टी करून धडेच्या धडे पाठ करणे हा आपल्या शिक्षणाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर काही वर्षांत हे बदलता येऊ शकते.