या तीन पद्धतींनी पीसी (कॉम्प्युटर) तुम्हाला नवीन शब्द शिकण्यास मदत करतो.

आपल्या अवतीभवती सतत शब्दचशब्द असतात. आपल्यात जो संवाद होतो, शाळेत जे विषय शिकवले जातात तसेच टीव्हीवरचे कार्यक्रम, क्रिकेट मॅच किंवा इतर बऱ्याच मनोरंजनपर कार्यक्रमांचा मूळ गाभा हे शब्दच असतात. मग आता सांगा, तुम्ही नवीन शब्द कसे शिकत असता?

1) वाचा, वाचा आणि वाचाच!

लहान मोठ्या सर्वांनाच लागू पडेल असा खात्रीशीर सल्ला म्हणजे रोज वाचणे. रोज वाचण्याने तुम्हाला नवीन नवीन शब्दांची ओळख तर होतेच शिवाय त्या भाषेतील संदर्भ तुम्हा समजू लागतात. इथे तुम्ही अशी युक्ती करू शकता की, तुम्हाला जो विषय सर्वाधिक आवडतो, त्याविषयीचे वाचन आधी कर कारण तुम्हाला ते वाचताना मज्जा आली की साहजिकच तुम्ही अधिक वेळ वाचाल. तुमच्या शाळेच्या लायब्ररीमध्ये जा, काल्पनिक आणि वास्तववादी अशा दोन्ही प्रकारच्या वाचनासाठी गुड रीड्स आणि रीड एनी बुक ह्यांची निवड करा. जर जास्त वेळ वाचणे तुम्हाला कंटाळवाणे वाटत असेल, तर फ्लिपबोर्ड आणि इनशॉर्ट्स यांच्यासारख्या न्यूज अॅग्रीगेटर वेबसाईट्स ना सबस्क्राईब करा. याद्वारे तुम्हाला तुमच्या पसंतीले लेख वाचायला मिळतील.

२) हो, खेळता खेळताही तुम्ही शिकू शकता

तुम्हाला आव्हान (चॅलेंज) घ्यायला आवडतं का? मग तर तुम्ही द प्रोब्लेम साईट, इसइंग्लिश आणि फ्री राईस या साईट्सवरचे गेम्स खेळूनच बघा. शाळेमध्ये ब्रेक टाईम असेल तेव्हा ग्रुपमध्ये तुम्ही हे गेम्स खेळू शकता आणि शाळा सुटल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी घरी सुद्धा हे गेम्स खेळू शकता. ह्यातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही, आणि गेम आहे म्हटल्यावर मध्येच सोडून देण्याचा प्रश्नच नाही. आता हा गेम खेळण्यामागे, स्वत:च्याच आधीच्या बेस्ट स्कोअरपेक्षाही जास्त स्कोअर करणे किंवा तुमच्या मित्रापेक्षा जास्त स्कोअर करणे, असा तुमचा काहीही उद्देश असला तरी दिवसाला एक जरी गेम खेळलात तरी एखाद दोन नवीन शब्दांची भर पडेलच तुमच्या ज्ञानात! मग हा असा फरक बघण्यासाठी गेम खेळून बघाच!

३) एक दिवस एक शब्द: असे आव्हान (चॅलेंज) स्वीकारूनच बघा!

जर तुम्हाला तुमचा स्वत:चा एक गेम तयार करायची इच्छा असेल, तर दिवसाला एक शब्द असे आव्हान घ्या. तुम्ही वर्ड थिंकच्या मदतीने तुमच्या वर्गमित्रांबरोबर, मित्र, ट्यूशनचा ग्रूप किंवा अगदी कुटुंबातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा हा गेम तयार करू शकता. आता हे ग्रुप म्हणजेच समूहात कसे करता येईल ते पाहूया:

१) एक मॉडरेटर (परीक्षक) नेमा: वेबसाईटवरून एक शब्द आणि त्याच अर्थ शोधून काढण्यासाठी एक व्यक्ती.
२) समूहातील/ ग्रुपमधील सगळ्या सभासदांना त्या शब्दाचा अर्थ लिहायला सांगा.
३) मॉडरेटर (परीक्षक) उत्तर तपासतो आणि योग्य उत्तराला गुण देतो.
शेवटी सगळ्या गुणांचा पडताळा करा आणि विजेत्याला काय हवे आहे ते त्याला किंवा तिलाच ठरवूद्या.

त्यामुळे आता #DellAarambh ह्यावर आम्हाला ट्वीट करा आणि आज तुमचे पाल्य कोणता नवीन शब्द शिकला/शिकली हे आम्हालाही कळवा.