क्लाऊड स्टोरेजमधून शिक्षकांना होणारे तीन फायदे

 

क्लाऊड स्टोरेज म्हणजे काय

क्लाऊड स्टोरेज म्हणजे तुमचा महत्वाचा डेटा साठविण्यासाठी ऑनलाइन उपलब्ध असलेली जागा. ज्या प्रकारे एक्स्टर्नल हार्ड ड्राइव किंवा यूएसबी फ्लॅश ड्राइव्ज सारख्या उपकरणांवर तुमच्या फाइल्सचा बॅकअप साठविता येतो, त्याचप्रकारे तुम्हाला आवश्यक अशा सर्व माहितीचा साठा क्लाऊड स्टोरेजवर सुरक्षितपणे करता येतो. सामान्यपणे वर्च्युअल सर्वर्सच्या मोठ्या नेटवर्कचा वापर करून ऑनलाइन डेटा साठवणूकीची सुविधा प्रदान केली जाते त्यात तुमच्या फाइल्सचे नीट व्यवस्थापन करण्यासाठी आणि तुमची वर्च्युअल स्टोरेज स्पेस सुसंघटित ठेवण्यासाठी टूल्स देखिल उपलब्ध असतात.

एक शिक्षक म्हणून मला या क्लाऊड स्टोरेजचा कसा फायदा होऊ शकतो?

1. विद्यार्थ्यांसाठी 24/7 शैक्षणिक स्त्रोत उपलब्ध करून देणे

तुम्ही कोणत्याही क्लाऊड स्टोरेज ची निवड केलीत तरी तुमच्या विद्यार्थ्यांना, पाठ्य सारांश, वेबसाइट्स, व्हिडिओज्, प्रश्नमंजुषा, खेळ, असाइनमेंट्स इत्यादी गोष्टी सर्व वेळी उपलब्ध होतील. यामुळे विद्यार्थी केवळ नोट्स तयार करत न बसता, वर्गात जे शिकविले जाते त्याकडे नीट लक्ष देतील.

2. विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे

जेव्हा ग्रुप प्रोजेक्ट (सामुहिक प्रकल्प) तपासण्याची वेळ येते, तेव्हा प्रकल्प जर क्लाऊड वर असेल, तर शिक्षकांना हे समजते की कोणत्या विद्यार्थ्याने किती काम केले आहे, तसेच प्रत्येक विद्यार्थाची बलस्थाने आणि कमकुवतपणा देखिल समजून येतो. अशाच प्रकारे, निबंध आणि सादरीकरणांसारख्या व्यक्तिगत असाइनमेंट्स साठी तुम्ही विद्यार्थ्यांना गरज भासली तर विविध पीसी स्त्रोत उपलब्ध करून देऊ शकता.

3. परीक्षेचे निकाल जलद गतीने देता येतात

क्लाऊड स्टोरेजचा वापर केल्यास जास्तीत जास्त परीक्षा घेता येतात आणि परीक्षांचे निकाल देखिल जलद गतीने देता येतात (स्वयंचलित यंत्रणा असेल तर निकाल लगेचच उपलब्ध होतात). यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेच्या आधी हे समजते की त्यांची कितपत तयारी झाली आहे आणि कोणत्या गोष्टींचा जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. दिलेल्या परीक्षांचे निकाल इतक्या लवकर मिळाल्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून ते जास्त चांगला अभ्यास करू लागतील.

मी कोणत्या क्लाऊड स्टोरेज ची निवड करावी?

किंमत (बहुतांशी सेवा विनामुल्य असतात), सुरक्षितता, प्रायवसी सेटिंग्ज आणि वापरण्याची सुलभता इत्यादी गोष्टींचा विचार करून त्याप्रमाणे क्लाऊड स्टोरेज ची निवड करावी. थोडासा वेळ काढून सर्व गोष्टींचा नीट विचार करून तुमच्या विद्यार्थ्यांची गरज आणि व्यावसायिक प्रगतीचा उद्देश यानुसार क्लाऊड स्टोरेज निवडा.

Amazon Drive आणि Google Drive सारखे काही विकल्प उपलब्ध आहेतच पण तुमचा सर्वात चांगला विकल्प म्हणजे स्वतःची Wikispaces Classroom तयार करणे.