ऑनलाइन साहित्यातील सत्य आणि काल्पनिकता यांमधील फरक ओळखण्याचे तीन मार्ग

 

कोलिन्स शब्दकोशातील, 2017 या वर्षातील अधिकृत शब्द "फेक न्यूज (नकली बातम्या)" म्हणजे असे काहीतरी ज्यात अनावश्यक तणाव, गोंधळ आणि संभ्रम निर्माण करण्याची क्षमता असते. [1]

कधी कधी जुन्या बातम्यांनाच लाइव ब्रेकिंग न्यूज (थेट बातम्या) म्हणून पुनःप्रसारित केले जाते, दिशाभूल करणारी चित्रे आणि व्हिडिओज् किंवा अवास्तव आणि अविश्वसनीय लेखांचे मथळे सोशल मिडिया आणि व्हॉट्स ॲप वर प्रसारित केले जातात.

कसेही असले तरी तथ्याला कल्पनेपासून वेगळे करणे कठीण असते आणि त्या खोट्या बातम्यांचा आपल्या मुलांच्या संवेदनाक्षम मनावर काय परिणाम होईल याची काळजी पालकांना असते.

खोट्या बातम्यांमधील "खोटेपणा" तपासून पाहण्यासाठी पुढे काही सूचना दिल्या आहेत :

1. लेखक पक्षपाती असणे

एखाद्या व्यक्तीप्रती किंवा विशिष्ट संस्थेप्रती पक्षपाती असलेल्या लेखकाचे दृष्टीकोन कधीच संतुलित नसतात. विविध दृष्टीकोनांतून बघण्याऐवजी एकच पक्षपाती दृष्टीकोन ठेवून लिहिल्यास तो लेख जास्त लक्ष वेधून घेतो. याद्वारे लोकांचे मत सहजतेने बदलता येते, विशेषतः जेव्हा या पक्षपाती लेखांना पुष्टी देणारे व्हिडिओज् किंवा चित्रे उपलब्ध असतात.

2. अवास्तव नाट्यीकरणाचा एक प्रकार

काळ्या पैशाचा माग लावण्यासाठी नविन चलनी नोटांमध्ये जीपीएस चिप
- आरबीआय ने, ही बातमी खोटी असल्याची पुष्टी केली [2]

राष्ट्रपती कोविंद यांना एका तासात तीन दशलक्ष अनुयायी मिळाले
- भारतातील प्रत्येक राष्ट्रपती एकच अधिकृत ट्विटर अकाउंट वापरतात. राष्ट्रपती कोविंद यांना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अनुयायी मिळाले आहेत. [3]

हरियाणाच्या जसलीन कौर ची नासा तर्फे 2030 मध्ये मंगळावर जाण्यासाठी निवड केली गेली
- पीएचडी ची विद्यार्थिनी आणि संशोधक असलेल्या त्या मुलीने ती अजूनही "इच्छुक अंतराळवीर" असल्याची पुष्टी केली. [4]

अशी कोणतीही गोष्ट जी खूप अवास्तव किंवा खूप जास्त वाटते ती खोटी बातमी असू शकते. जर एखाद्या सत्यता पडताळणी न केलेल्या गोष्टीबद्दल एखाद दुसरे वाक्य छापून आले असेल तर ठीक आहे पण जर संपूर्ण लेख छापून आला असेल तर ती मोठी धोक्याची सूचना ठरू शकते.

3. फक्त एकच स्त्रोत उपलब्ध असेल तर

जर तुम्हाला तीच गोष्ट ऑनलाइन इतरत्र कुठेही आढळली नाही किंवा दिलेल्या लेखाला वैध ठरवणारे अन्य स्त्रोत उपलब्ध नसतील तर ती बातमी खोटी असू शकते. जर इतर सर्व मोठी प्रकाशने त्याबद्दल काही बोलत नसतील, तर ही शक्यता असू शकते की ती बातमी केवळ पक्षपातीच नसून, एखाद्या व्यक्तीने किंवा समूहाने जनतेचे मत बदलण्यासाठी मुद्दाम तयार करून पसरवली आहे.

पालकत्व नेहमीच अवघड असते आणि त्यातही डिजिटल पालकत्वाची तर स्वतःचीच काही आव्हाने असतात. तरी देखिल, पीसीची उपलब्धता आणि योग्य माहितीचे ज्ञान यांच्या आधारे तुम्ही डिजिटल पालकत्व अतिशय कुशलतेने निभावू शकता. हॅप्पी डिजिटल पॅरेन्टिंग (डिजिटल पालकत्वासाठी शुभेच्छा!)