कोड कसे करावे ते शिकायला तुम्हाला मदत करणा-या तीन वेबसाइट्स

"जर मी एक फ्रेंच विद्यार्थी असतो, आणि माझे वय 10 वर्षे असते, तर माझ्या दृष्टीने कोडींग शिकणे हे इंग्रजी शिकण्यापेक्षा महत्वाचे असते. मी लोकांना इंग्रजी शिकू नका असे सांगत नाहीये परंतु ही अशी भाषा आहे जिचा वापर करून तुम्ही जगातील 7 अब्ज लोकांना तुमचे म्हणणे सांगू शकता. मला असे वाटते की जगातील प्रत्येक सार्वजनिक शाळेत कोडींग शिकवले जाणे गरजेचे आहे." - टीम कूक, ॲपल इन्क चे सीईओ [1]

 

कोडर म्हणजे यंत्रमानव नसतो. तसेच तो सायबोर्ग किंवा कृत्रिम प्रकार नसतो. तो कोडर म्हणजे यंत्रमानव नसतो. तसेच तो सायबोर्ग किंवा कृत्रिम प्रकार नसतो. तो किंवा ती अगदी सामान्य व्यक्ती असू शकते. तुमचा खास मित्र किंवा तुमचा शेजारी देखिल असू शकतो ज्याचे विचार स्पष्ट असतील आणि तो सर्व जगाला सहज समजेल असे कोड लिहित असेल. तुम्ही पुढील प्रमाणे सुरूवात करू शकता :

मूलभूत गोष्टींपासून सुरूवात करा

कोड शिकण्यासाठी Codecademy (कोडकॅडमी) एक प्रसिद्ध स्त्रोत आहे ज्याचा वापर करून 45 दशलक्ष व्यक्ती कोडींग शिकत आहेत. त्यांचा इंटरफेस हा वापरण्यास अत्यंत सोपा असून, प्रत्येक पातळीसाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे. यातील प्रत्येक शिक्षणक्रमात, केवळ नविन ॲप न बनवता, प्रत्येक गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी तुमच्या मेंदूला प्रशिक्षित केले जाते. त्याचा तुम्हाला इतर विषयांचा अभ्यास करताना देखिल उपयोग होतो.

तरबेज होईपर्यंत खेळा

काहीतरी नविन शिकणे हे मनोरंजक तसेच भीतीदायक देखिल असते. कोडींग देखिल याला अपवाद नाही. यात देखिल शिकण्यासारखे खूप काही आहे. सुरूवातीला तुम्ही कोड्स च्या जगप्रसिद्ध "अवर ऑफ कोड" साठी एक तास देऊन ते तुमच्यासाठी योग्य आहे का ते पाहू शकता. हे करताना तुम्ही सरावासोबतच अनेक मनोरंजक खेळ खेळून आनंद मिळवू शकता. क्लासिक माइनक्राफ्ट पासून ते तुमचा स्वतःचा खेळ तयार करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा यात समावेश केलेला आहे.

तुमचे स्वतःचे कोड निर्माण करा

Scratch – हे एमआयटी मिडिया लॅब वेंचर (उद्यम) आहे. ज्याचा वापर करून, तुम्ही तयार केलेल्या गोष्टी, खेळ, ॲनिमेशन्स यांना जिवंत करू शकता.
प्रगत भाषांची मूलभूत तत्वे शिकत असतानाच योग्य संख्येत कमांड्स (निर्देश) वापरून तुम्ही काहीही तयार करू शकता. त्याचबरोबर, ऑनलाइन अनेक कोडर्स सतत उपलब्ध असतात जे त्यांचे वैयक्तिक अनुभव आणि ज्ञान तुमच्या सोबत वाटण्यास नेहमी तयार असतात.

कोड तयार करायला कोणीही शिकू शकतं. तुम्हाला फक्त योग्य पीसी ची आवश्यकता आहे. एकदा सुरूवात केली की काही तासातच तुम्ही त्यातील मूलभूत गोष्टी शिकू शकता आणि काही आठवड्यांमध्ये तुम्ही बिगिनर (नवशिक्या) वेबसाइट्स आणि ॲप्स तयार करू शकता. तांत्रिक जगातील पुढील यंग अचिवर (तरूण प्राप्तकर्ता) बनण्याच्या मार्गावर तुमची वाटचाल सुरू होऊ शकते.