तुमच्या मुलासाठी हायब्रीड शिक्षणाचा कसा उपयोग करून घ्यावा याबद्दल सल्ले

हायब्रीड अध्ययनात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी फक्त ऑनलाईन प्रणालीचा पूर्णपणे वापर करून घेतला जातो. महामारीमुळे बहुतेक सर्व शाळांमध्ये आता ही सामान्य बाब बनली आहे. हायब्रीड शिक्षण आता इथे राहणारच असल्यामुळे, पालकांना आपल्या मुलांसाठी ते कसे अधिक मजेशीर आणि अर्थपूर्ण करता येईल, याबद्दलचे काही सल्ले इथे दिले आहेत:

  1. अभ्यासासाठी एक ठराविक जागा: पालक वर्क-फ्रॉम-होमसाठी ज्याप्रमाणे रिमोट ऑफिसकरता एका जागेचा वापर करतात, त्याप्रमाणे मुलांनासुद्धा त्यांच्या वर्गात उपस्थित राहण्यासाठी आणि नेहमीच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी एक स्वतंत्र जागा आवश्यक असते.
  2. स्वत: दिशा दिलेले अध्ययन: वर्ग चालू असताना सतत मुलांना मदत करणे टाळा. म्हणजे मुले संबंधित विषय स्वत समजून घेण्याचा प्रयत्न करतील कारण त्याची जबाबदारी फक्त त्यांच्यावरच असेल. असे केल्यास लहान वयातील मुले स्वतंत्रपणे शिकू लागतात.
  3. इंटरअॅक्टीव्ह साधने वापरा: रिमोट लर्निंगमध्ये  व्हाईटबोर्ड्स, लाईव्ह चॅट् आणि सतत अभिप्राय अशी साधने वापरा. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद आणि सहभाग अधिक चांगला होतो. या गोष्टींचा उपयोग करून लाजाळू मुलांना संवाद साधण्यास आणि वर्गात बोलते करण्यात मदत होऊ शकते.
  4. वारंवार विश्रांती द्या: सततचा स्क्रीन-टाईम घातक होऊ शकतो. तो टाळण्यासाठी कोडी सोडवणे, ऑडिओ बुक्स ऐकणे अशा अर्थपूर्ण गोष्टी ऑनलाईन वर्गांच्या मधल्या काळात करा, त्यामुळे स्क्रीन-टाईम मर्यादित राहतो.
  5. सर्व-समावेशक अध्ययन: शिक्षण समग्र आणि मजेशीर असले पाहिजे. PC द्वारे शिक्षण आणि इंटरअॅक्टीव्ह प्रत्यक्ष उपक्रम यांचा एक योग्य मेळ साधला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्याचे एकंदर लक्ष केंद्रित करणे, आऊटपुट आणि उत्पादकता वाढण्यास मदत होईल.

 

तुमच्या मुलासाठी तुम्ही PC द्वारे शिक्षणाचा कसा अधिक उपयोग करून घेऊ शकता, हे जाणून घेण्यासाठी आमचे वेबिनार पहा - https://www.dellaarambh.com/webinars/