तुम्हाला एक उत्तम विद्यार्थी बनायची इच्छा आहे?

 

 

परीक्षांमुळे दमछाक होऊ शकते. परीक्षेच्या तणावामुळे तुम्ही स्वतःच्या क्षमतेइतके काम करू शकत नाही. थोड्याश्या तणावमुक्तीच्या सूचना आणि थोडे वेळेचे नियोजन या गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुम्हाला मिळालेल्या वेळेचा पुरेपूर उपयोग करून घेऊ शकता. कसे ते पुढे दिले आहे -

1. कामांची यादी तुमची मित्र असते

तुम्हाला ज्या विषयांचा अभ्यास करायचा आहे आणि ज्या असाइनमेंट्स पूर्ण करून तपासायला द्यायच्या आहेत, त्यांची यादी तयार केली तर तुम्हाला कोणतीही गोष्ट विसरली जाण्याची भीती नसते. पूर्ण झालेली कामे आणि शिल्लक राहिलेली कामे यांची स्पष्ट माहिती असल्यामुळे तुम्ही कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वेळेचे भान राहते.

कामांची यादी बनविण्यासाठी उपलब्ध असलेले पीसी स्त्रोत:
टूडूइस्ट
गूगल कीप

2. स्व-प्रेरणेने नोट्स (नोंदी) घ्या

तुम्ही घेतलेल्या नोंदी जेव्हा नीट एकत्र केल्या जातात तेव्हा तुमचे निम्मे काम झालेले असते. असाइनमेंट द्यायच्या आधी किंवा परीक्षेची तयारी करायच्या आधी, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भरपूर माहिती मधून नक्की काय वापरायचे असा प्रश्न नोंदी तयार असल्यावर पडत नाही. पीसी वरील काही साधने तुमच्याकडील टेक्स्ट, आकृत्या, वेबपेजेस, व्हिडिओज् आणि ऑडिओ क्लिप्स यांसारखे सर्व स्त्रोत तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतात.

नोंदी करण्यासाठी पीसी वरील काही स्त्रोत:
एवरनोट
वन नोट

3. तुमचे ध्येय नेहमी नजरेसमोर ठेवा

मूड बोर्ड्स तुमच्या ध्येयांचे चित्ररूप प्रदर्शित करतात. तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी ज्या गोष्टींनी प्रेरणा मिळते त्या सर्व गोष्टी तुमच्या मूड बोर्ड वर असाव्यात. तुमची शैक्षणिक किंवा इतर ध्येये दृश्यरूपात नजरेसमोर ठेवल्याने तुम्हाला ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रेरणा मिळत रहाते.

तुमचा मूड बोर्ड बनविण्यासाठी पीसी स्त्रोत:
गो मूडबोर्ड
कॅनवा

4. तुमचे "तास" शोधा

वेळेचा मागोवा घेणा-या वेबसाइट्स तुम्हाला किती वेळ खर्च झाला त्याची स्पष्ट कल्पना देतात, ज्याचा वापर करून तुम्ही वेळखाऊ कामे बाजूला ठेऊन महत्वाची कामे आधी करून वेळेचे नीट व्यवस्थापन करू शकता. तुम्ही निशाचर असा किंवा पहाटे लवकर उठणारे असा, तुमची एकाग्रता कधी जास्त असते ते समजून घेऊन तुमचे अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा.

तुम्हाला मदत करणारे पीसी स्त्रोत:
टोगल
टाइम कँप

5. तुमच्याप्रमाणेच ध्येयाने भारित लोकांच्या सानिध्यात रहा

चिकाटी ही संसर्गजन्य असते. अभ्यासाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि नियमित पणे सराव करणा-या व्यक्ती तुमच्या सभोवताली असतील तर तुम्ही देखिल प्रेरणा घेऊन त्याप्रमाणे वागू लागाल.

वर्गात लक्षपूर्वक अभ्यास करण्याइतकेच घरी अभ्यास करणे देखिल महत्वाचे असते. तुम्हाला गृहपाठ नेहमीच दिला जाईल. त्यासाठी इथे दिलेल्या सात पीसी स्त्रोतांचा वापर करा आणि दिलेला गृहपाठ देखिल तितक्याच उत्साहाने पूर्ण करा.