तुमच्या मुलांना शिकण्यास आवडतील अशा वेबसाइट्स : वयानुसार मार्गदर्शक

 

तुम्ही तुमच्या पाल्यासाठी पीसी विकत घेतलात आणि त्या पीसीचा अभ्यासासाठी वापर होताना पहाण्याची तुम्हाला घाई झाली आहे. पण, पीसी च्या मदतीने अभ्यास कसा करावा ते कसे समजणार? ते समजण्यासाठी तुमच्या मुलांच्या वयाच्या अनुषंगाने पुढे काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

5 - 7 वर्षे

शाळेतून आल्यानंतर तुमच्या पाल्याला गुंतवून ठेवण्यासाठी पीसी वर मनोरंजन आणि अभ्यास यांचा समन्वय असलेले खेळ (लर्निंग गेम्स फॉर किड्स) तुम्ही वापरू शकता. या गेम्स च्या मदतीने तुमची मुले शाळेतून आल्यावर स्वतः रूची घेऊन आनंदाने अभ्यास करण्यास तयार होतील आणि त्यामुळे त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होईल. यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सर्व खेळ हे वयाच्या अनुसार विभाजित केलेले आहेत आणि सर्व खेळ अनुक्रमे पहाण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे.

8 - 10 वर्षे

अपटूटेन ची सुलभता, त्यावरील रंगित ॲनिमेशन्स आणि छोटे छोटे व्हिडिओज् यांमुळे ही वेबसाइट मुलांमध्ये अत्यंत प्रसिद्ध झाली आहे. व्हिडिओज् मध्ये वापरली गेलेली भाषा ही अत्यंत खेळीमेळीची आणि आश्वस्त करणारी आहे. त्यामुळे मुलांमध्ये स्वतःच्या मित्रांकडून शिकत असल्याची भावना निर्माण होते आणि शिकलेल्या संकल्पना दृढ होतात. तसेच त्यावर संवादात्मक रंगित पाने आणि खेळ देखिल आहेत, ज्यांच्या द्वारे अभ्यास सोपा केला जातो.

10 - 12 वर्षे

या वयात मुलांना शब्दसंग्रह, अंकगणित इत्यादी मूलभूत संकल्पना माहित झालेल्या असतात आणि त्यांना शाळेत शिकविल्या जाणा-या गोष्टींबद्दल जास्त माहिती जाणून घेण्याची इच्छा असते. येथेच वंडरपोलिस ची मदत घेता येते. येथे तुमची मुले एखाद्या संकल्पनेचा अर्थ समजून घेऊ शकतात किंवा नविन माहिती मिळवू शकतात किंवा महत्वाच्या गोष्टींचा जगात कसा वापर केला जातो ते देखिल शिकू शकतात.

वय वर्षे 12 आणि पुढे

तुमच्या मुलांच्या पीसीच्या ब्राऊजर वर ब्रेनस्केप ही वेबसाइट बुकमार्क करून ठेवा. त्या वेबसाइटवर तज्ञ शिक्षकांनी बनविलेली, प्रत्येक विषयाशी संबंधित फ्लॅशकार्ड्स उपलब्ध असतात ज्याचा तुमच्या पाल्याला अभ्यासाची उजळणी करताना उपयोग होतो. परीक्षेपूर्वी त्यांचा वापर करून तुमचा पाल्य स्वतःचे ज्ञान तपासून किती अभ्यास करण्याची गरज आहे ते ठरवू शकतो. त्याचप्रमाणे बरोबर उत्तर दिल्यावर येणारा आत्मविश्वास तुमच्या पाल्याच्या मनातील परीक्षेची भिती नाहीशी करू शकतो.

थोडीशी शोधाशोध केल्यास तुम्ही तुमच्या मुलांसाठी उपयुक्त अशा इतरही अनेक गोष्टी शोधू शकाल. ते करताना चेकलिस्ट (सूची) लक्षात ठेवलीत तर तुमच्या पाल्यासाठी तुम्हाला नक्कीच उत्तम गोष्टी मिळतील.