विद्यार्थ्यांच्या कोणत्या प्रकारात तुमची गणना होते

तुम्ही, सामाजिक फुलपाखरू, वर्गातील हुषार विद्यार्थी किंवा कदाचित दोन्ही असू शकता. नक्की काय ते शोधून काढण्यासाठी पुढील लेख वाचा!

1. सामाजिक फुलपाखरू

तुमच्यामध्ये उपजतच नेतृत्वगुण आहेत त्यामुळे तुमच्या भोवती सतत तुमचे एकनिष्ठ अनुयायी असतात आणि तुम्ही इतके चैतन्यपूर्ण असता की त्याची तुलना होऊच शकत नाही. सर्वजण तुम्हाला ओळखतात...

2. मिस शाय (लाजाळू कन्या)

तुम्ही एकतर अशी व्यक्ती आहात जी फक्त अत्यावश्यक असेल तेव्हाच बोलते, किंवा तुमचे सहविद्यार्थी तुमच्या बद्दल काय विचार करतील याची तुम्हाला भिती वाटत असते - यात काहीच वावगे नाही, प्रत्येकाला कुठून ना कुठून तरी सुरूवात करावीच लागते.

3. स्मार्टी (हुषार)

तुम्ही कोण आहात ते तुम्ही जाणता.
तुम्ही तयार केलेल्या नोट्सनां कायम मागणी असते.

4. खंबीर आणि शांत

तुम्ही मिस शाय आणि स्मार्टी या दोन्हींचे मिश्रण आहात - तुम्ही प्रत्येक गोष्टीत अग्रगण्य आहात हे पाहून लोकांना नेहमीच आश्चर्य वाटत असते.

5. क्वेश्चन मास्टर (प्रश्न विचारण्यात पटाईत)

तुम्हाला कोणत्याही वेळेस कोणताही प्रश्न सुचू शकतो आणि तो विचारण्यास तुम्ही अजिबात लाजत नाही त्यामुळे, तुमच्या शिक्षकांना तुमचे कौतुक वाटण्याबरोबरच कधीकधी तुमचा रागही येतो.

तर मग तुम्ही कोणत्या प्रकारात येता?

विद्यार्थी असण्याचा सर्वात उत्तम फायदा म्हणजे, तुमची मानसिकता जर चांगली असेल आणि तुमच्याकडे स्त्रोत उपलब्ध असतील, तर शिकत असलेला विषय अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेऊन तुम्ही तुमचे ज्ञान सतत वाढवू शकता. घरी आणि शाळेत पीसी ची उपलब्धता, प्लान इन माइंड (मनातील आराखडा) आणि प्रेरणा या सर्व गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुमच्या शैक्षणिक वर्षात उत्तम यश मिळवू शकता.