एक चांगला शिक्षक उत्तम कसा बनतो?

 

 

"टीचिंग इज द वन प्रोफेशन दॅट क्रिएट्स ऑल अदर प्रोफेशन्स शिक्षण हा एक असा व्यवसाय आहे ज्यातून इतर साऱ्या व्यवसायांचा उगम होतो."
-अज्ञात. [1]

एखादा शिक्षक उत्तम कसा बनतो? एखादा पालक असे सांगू शकेल की, जो शिक्षक त्यांच्या पाल्याची शैक्षणिक क्षमता नियमितपणे विकसित करतो तो उत्तम शिक्षक असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना विचारले तर ते सांगतील की, रोजचा अभ्यास जे मनोरंजक पद्धतीने शिकवतात आणि कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून लक्षात ठेवायला मदत करतात ते उत्तम शिक्षक असतात.

मग, असे काय आहे जे चांगल्या शिक्षकाला उत्तम बनवते?

1. त्यांचे ध्येय निश्चित केलेले असते

जेव्हा तुम्ही एखादे ध्येय निश्चित करता, तेव्हा तुम्ही दूरदृष्टीने वागता. त्यासाठी लागणारे प्रोत्साहन आणि करावी लागणारी कृती ही नैसर्गिकरित्याच येते. उच्च अपेक्षा ठेऊन तुम्ही स्वतःला योग्य दिशा आणि वास्तवतावादी दृष्टीकोन देता.

2. प्रत्येक तासाच्या आधी ते तयारी करतात

जर तुमच्याकडे कृतीची काही योजना तयार नसेल तर तुमच्या ध्येयाला काय अर्थ? म्हणूनच पाठ्य योजना तयार करणे हा शिकवण्यातील अतिशय महत्वाचा भाग आहे. हे, मुख्य कार्यक्रमाच्या आधी रंगित तालीम करण्यासारखे असते.

इथपासून सुरूवात करा: पाठ्य योजनांसाठी तुमची महत्वाच्या 5 मुद्द्यांची यादी

3. ते लक्षपूर्वक ऐकतात

ही अशी गोष्ट आहे जिच्याकडे आपण बरेचजण दुर्लक्ष करतो. आपण फक्त ऐकतो, लक्षपूर्वक ऐकत नाही. अनेक वर्षांच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की जे शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून, समजून त्यांच्याशी संवाद साधतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात त्यांचे विद्यार्थी अभ्यासात लक्ष देऊन पुढे आयुष्यात देखिल यशस्वी होतात. 

4. ते त्यांचे शिकविणे दैनंदिन जीवनाशी जोडतात

येथे पीसी महत्वाची भूमिका बजावतो. पीसी मुळे शिक्षणात चैतन्य येते. पीसी वर सहजपणे उपलब्ध असलेल्या प्रेझेन्टेशन्स, व्हिडिओज्, इन्फोग्राफिक्स, शैक्षणिक खेळ आणि इतर अनेक शैक्षणिक स्त्रोतांमुळे, शिक्षण संवादात्मक बनते.

5. ते आयुष्यभर शिकत असतात

तुमच्या शैक्षणिक कारकीर्दीमध्ये तुम्ही कुठल्याही स्थानावर असलात, तरी तुम्ही तुमचे वाचन चालू ठेवले पाहिजे आणि तुमच्या विषयाशी संबंधित सर्व नविन गोष्टींची माहिती तुम्हाला असली पाहिजे. त्याहून चांगले म्हणजे, तुम्ही तुमच्या विषयाशी संबंधित नसलेल्या इतरही नविन गोष्टींबद्दल वाचन केले पाहिजे ज्यातून तुम्हाला गोष्टींकडे बघण्याचा नविन दृष्टीकोन मिळेल. तुम्हाला यातून बौद्धिक उत्तेजन तर मिळलच शिवाय, अनेक नविन संधी देखिल उपलब्ध होतील.

हे सर्व #DigitalLearning शी संबंधित आहे, ज्यात तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी पीसीच्या मदतीने तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करता.