असाइनमेंट्स आणि चाचण्या तपासताना काय लक्षात ठेवावे

 

 

प्रश्नपत्रिका तपासणे ही एक अशी गोष्ट आहे जी पटापट झाली तर बरे असे सर्वच शिक्षकांचे मत असते. ठराविक काने होणा-या परीक्षा, वर्गातील चाचण्या नियमितपणे होणा-या असाइनमेंट्स यांना तपासण्यासाठी तुम्ही योग्य साधनांसह नेहमी उत्साहाने तयार असले पाहिजे. पुढे दिलेल्या मार्गदर्शक गोष्टी लक्षात ठेवा मग तुम्ही तपासण्याचे काम अधिक कार्यक्षमतेने करू शकाल.

1. तुमची उत्तरांची वही तयार ठेवा

एखादे वर्ड डॉक्यूमेंट किंवा एक्सेल शीट वापरून तुमचे प्रश्न आणि उत्तरे तयार ठेवा. प्रश्नपत्रिका तपासताना त्यांची मदत होईल. तसेच प्रश्नांची सर्व संभाव्य उत्तरे देखिल तुमच्याकडे तयार ठेवा जेणेकरून प्रश्नपत्रिका पटापट तपासून होतील.

2. प्रत्येक प्रश्नपत्रिका तपासत बसण्याऐवजी एका वेळी एक भाग तपासा

या पद्धतीने तपासण्याचे काम सोपे आणि जलद गतीने होते. तसेच तुम्हा वर्गातील विद्यार्थ्यांना नक्की काय कठीण वाटत आहे ते समजून येईल. एका वेळी एक भाग तपासल्याने तुम्हाला तपासण्याची एक लय प्राप्त होईल आणि काम सोपे होईल.

3. तुमच्या अभिप्रायाचे एक पत्रक तयार करा

विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टींमध्ये अडचण येत आहे याची यादी बनवून त्यावरील सर्वांसाठी एकत्रितपणे तयार केलेला अभिप्राय व त्या अडचणी दूर करण्यासाठी पीसी वरील, वापरण्यास सोपे असे काही स्त्रोत असलेले एक पत्रक तयार करा. वर्गातील चाचण्या, पूर्वपरीक्षा आणि असाइनमेंट्स साठी असे करणे खूप फायदेशीर ठरते. यातून तुमच्या विद्यार्थ्यांना हे समजून येते की त्यांचे काय चुकत आहे आणि कोणत्या गोष्टी त्यांना चांगल्या येत आहेत.

4. पीसी ग्रेडिंग टूल्सचा वापर करून पहा

चाचण्या आणि असाइनमेंट्स ऑनलाइन तपासण्यासाठी जम्प्रो च्या क्लासरूम एडिशन (संस्करण) ला साइनअप करा. शिक्षकांनी वैयक्तिक वापरासाठी घेतले तर हे मोफत उपलब्ध आहे. सुरूवातीला हे वापरताना थोडा वेळ लागेल पण त्याची सवय झाल्यावर काम पटकन होईल. यात सर्वकाही एकत्रित असल्यामुळे, हे शिकण्यासाठी घेतलेल्या कष्टांचे चीज होईल यात शंका नाही.

5. पीसी वरील चाचण्या आणि असाइनमेंट्स वापरून पहा

गूगल क्लासरूम वापरून किंवा तुमची स्वतःची विकीस्पेस क्लासरूम तयार करून, विद्यार्थ्यांना पीसी वर चाचण्या किंवा असाइनमेंट्स द्या. तसे केल्याने तुम्हाला निकाल त्वरीत उपलब्ध होईल.

शिकविण्यासाठी आवश्यक ते स्त्रोत पीसी वर पटकन उपलब्ध झाल्याने तुमच्या शिकविण्याच्या पद्धतीत खूप चांगला बदल घडून येईल. तसेच पीसीचा वापर करून तुमच्या धड्याच्या योजना तयार केल्याने तुमच्या विद्यार्थ्यांनाही शिकायला खूप आवडेल.