डेल आरंभसाठी संयुक्त राष्ट्रांच्या टिकाऊ विकास उद्दीष्टांचा अर्थ काय आहे?

 

2015 च्या सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण परिषदेने टिकाऊ विकासासाठी 2030 चं धोरण स्वीकारलं.त्याच्या केंद्रस्थानी 17 टिकाऊ विकास-उद्दीष्टं (एसडीजी) होती. ही विकास उद्दीष्ट साध्या करण्यासाठी देशांना गरीबी निर्मूलन, आरोग्य आणि शिक्षणाता सुधारणा, विषमता कमी करणं, आर्थिक विकासाला चालना देणं आणि पर्यावरणातल्या बदलांना सामोरं जाण्याचं आवाहन करण्यात आलं.

सर्वांना आयुष्यभर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच, देशांनी आपल्या नागरिकांना समावेशक आणि न्याय्य असं दर्जेदार शिक्षण मिळेल याची खातरजमा करावी, असं या दीर्घकालीन विकास उद्दीष्टांमधलं क्रमांक 4 चं उद्दीष्ट होतं.

 

 

आज पर्यावरण बदलांसारख्या समस्या हा कळीचा मुद्दा बनला असताना, स्वतःला शिक्षित करण्याची गरज कधी नव्हे एवढी अधिक आहे. त्यासाठी आपण स्वतःला योग्य कौशल्यं, मूल्यं आणि वृत्ती यांनी सुसज्ज करायला हवं. दर्जेदार शिक्षण उपलब्ध झालं, तर आर्थिक वाढीला मदत होईल, स्वावलंबन आत्मसात करता येईल आणि अधिक गुणवत्तापूर्ण आयु्ष्य जगता येईल.

सध्याच्या काळात तंत्रज्ञानात रोज नवनवीन शोध लागत आहेत.अशा परिस्थितीत मूलभूत कौशल्यं आत्मसात करणं गरजेचं आहे, कारण शिक्षण दिवसेंदिवस ऑनलाईन अभ्यासक्रम आणि परस्पसंवादी शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून डिजिटल माध्यमाकडे जात आहे.  1

ही डिजिटल दरी भरुन काढण्यासाठीच डेल टेक्नॉलॉजीज् आणि युनेस्को एमजीआयईपी यांनी एकत्र येऊन शालेय शिक्षकांना संगणक कौशल्यं शिकवण्याचं ठरवलं आहे. या द्वारे ते गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कौशल्यांचा शिक्षकांमध्ये प्रसार करणार आहेत. त्यामुळे मुलांमध्ये शिक्षण आणि कौशल्यविकास करायला हातभार लागेल.

डेल आरंभ आणि युनेस्को एमजीआयईपीचा ‘फ्रेमरस्पेस’ हा प्लॅटफॉर्म एकत्रितपणे निवडक शिक्षकांना प्रशिक्षण देतील आणि त्या माध्यमातून शिक्षणासाचा एसडीजी 4.7 साध्य करण्याचा प्रयत्न करतील. शांततामय आणि टिकाऊ समाजासाठी त्याची गरज आहे.

डेल आरंभने माहिती आणि संवाद तंत्रज्ञानात (आयसीटी) उपलब्ध करुन दिलेल्या मंचाच्या आधारे शिक्षकांचा डिजिटल शिक्षणाचा प्रवास जोशात सुरु होईल. दरम्यान, शिक्षणाचा दर्जा उंचाण्यासाठी फ्रेमरस्पेस शिक्षकांमध्ये दर्जेदार कंटेट-निर्मितीच्या क्षमता आणि विश्लेषणात्मक अंतर्दृष्टी निर्माण करेल.

फ्रेमरस्पेस हा कृत्रिम बुद्धिमत्तेनं सुसज्ज असा प्लॅटफॉर्म असून त्या द्वारे शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक शिक्षण-योजना आखणं, अंमलात आणणं आणि त्यावर लक्ष ठेवणं शक्य होईल. त्यातून शिक्षकांना आयसीटी आणि आघाडीच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळेल, त्यायोगे शिक्षक मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी मदत करु शकतील.

हा प्रसार तीन टप्प्यांमध्ये होईल: शिक्षकांना फ्रेमरस्पेस वापरण्याचं प्रशिक्षण देणं, ज्या शिक्षकांनी 200 तासांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना संयुक्त प्रमाणपत्र देणं आणि शिक्षणारवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेणं.

या भागीदारीच्या माध्यामातून आम्ही  शिक्षणाची एसडीजी साध्य करण्यात लक्षणीय प्रगती करु असा आम्हाला विश्वास वाटतो. त्याचप्रमाणे या माध्यमातून इतरांना डिजिटल प्रशिक्षण देत राहतील असे शिक्षक-समूह घडवण्याची आम्हाला आशा आहे.