२०१८, हे वर्ष पीसी/कॉम्प्युटर वर्ष का आहे?

 

तुम्ही पीसी/ कॉम्प्युटरचा वापर का करता?

कामासाठी

ऑनलाईन बँक सुविधेसाठी

गेम्स खेळण्यासाठी

पिक्चर डाऊनलोड करण्यासाठी

तुमच्या पाल्याला अभ्यासात मदत होण्यासाठी

की वरील सर्व गोष्टींसाठी?

बहुतेक सर्वजण ह्या सगळ्या कारणांसाठी पीसीचा वापर करतात. आणि आपल्या लहानग्यासाठी जरा जास्तच वापर करतात. २०१८ या वर्षात शिक्षणाच्या दृष्टीने आपणह्या

कॉम्युटर जगाकडून काय अपेक्षा करतो आहोत, चला पाहूया:

१. तुम्हाला अधिकाधिक मेकरस्पेसेस आढळतील.

मेकरस्पेस ही अशी जागा आहे, जिथे विद्यार्थी कॉम्प्युटर (पीसी) वर विविध टूल्स आणि मटेरियल्सच्या मदतीने नवनवीन गोष्टींची निर्मिती करू शकतात, शोध लावू शकतात, खेळाचा आनंद घेऊ शकतात आणि संशोधन करू शकतात. [1] सत्य हे आहे, की प्रत्यक्ष कृतीमुळे मुलांचे विश्वच बदलून जाते आणि शाळांमधून आता ह्याची दखल घेतली जात आहे. तंत्रज्ञ मंडळी अस्तित्वात असलेले मेकरस्पेसेस पीसीवर अपग्रेड करत आहेत किंवा नव्याने तयार करत आहेत त्यामुळे सर्व वयातील विद्यार्थी वर्गात शिकवलेल्या विषयाचा प्रत्यक्ष अनुभव या माध्यमातून घेऊ शकताहेत.

२. क्लाऊड स्टोरेजचा वापर तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे.

क्लाऊड स्टोरेज हे 24/7 उपलब्ध असलेले एक ऑनलाईन हब आहे. त्याच्याद्वारे तुम्ही कुठूनही तुमचा डेटा अॅक्सेस करू शकता. फक्त त्यासाठी तुमच्या मुलांकडे इंटरनेट, पीसी आणि ई-मेल आय-डी या सुविधा उपलब्ध हव्यात. ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राईव्ह, वन ड्राईव्ह - फार थोडे पर्याय असे आहेत, जे मोफत वापरता येतात आणि विश्वासार्ह सुद्धा असतात. सगळे शैक्षणिक साहित्य (लर्निंग मटेरीयल) एकाच ठिकाणी ठेवण्यापेक्षा, क्लाऊड स्टोरेजचा वापर केलात तर तुमच्या मुलांनी मेहनतीने तयार केलेला डेटा हरवण्याची भीती नाही.

३. गेम्स हेच शिक्षणाचे माध्यम असेल

हल्ली वर्गांमधून, घोकंपट्टी करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यावर भर दिलेला असतो. त्यामुळे मुलांना वर्गात शिकवलेल्या संकल्पना शिकण्यासाठी तसेच त्यांचा सराव करण्यासाठी गेम्स हे अगदी प्रभावी आणि मनोरंजक माध्यम आहे. गेम्सचे एक सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये सर्व वयातील मुलांसाठी, मनोरंजन आणि शिक्षण यांचा उत्तम मेळ साधलेला असतो. काही उदाहरणे पुढीलप्रमाणे- इंग्लिश शब्दसंपदा वाढवण्यासाठी अल्फाबेट बिंगो, गणितासाठी लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन (च्यापेक्षा मोठे किंवा लहान) आणि भूगोलासाठी कॅपिटल्स ऑफ द वर्ल्ड. पीसीवर तुम्ही जितके शोधत जाल, तितका माहितीचा खजिना तुम्हाला सापडत जाईल.
मुलांना पीसी एनेबल्ड लर्निंग (पीसीच्या मदतीने अभ्यासा)ची सवय लावून भविष्यासाठी तयार कारणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, हे २०१८ चे सर्वात मोठे आव्हान आहे.