शिक्षकांना मार्गदर्शकाची (मेन्टरची) गरज का असते

 

प्रत्येक शिक्षकाचे एक उद्दिष्ट असते. हे उद्दिष्ट पदोन्नती, एखाद्या ठराविक विषयात प्रभुत्व मिळविणे, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे किंवा अगदी एखादी शाळा स्थापन करणे हे असू शकते. मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही योग्य दिशेने मार्गक्रमण करण्यास सुरूवात कराल - का ते पहाः

१) आपल्याला एखाद्या अशा व्यक्तीची गरज असते ज्याच्याशी आपण बोलू शकतो

‘‘मेन्टरिंग (मार्गदर्शन) म्हणजे बौद्धिक चर्चा, आपले ऐकणारी आणि योग्य दिशेने चालना देणारी व्यक्ती.’’ जॉन सी. क्रॉसबी [1]

कधीकधी, केवळ बोलण्यामुळे एखादी मोठी समस्या अगदी सहज सोडविता येणारी लहानशी बाब असते. आपल्यापाशी मेन्टर असणे म्हणजे तुमच्या चुकांचा निवाडा न करता किंवा भीती न वाटता किंवा ओशाळे न वाटता, चांगले आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींची देवाणघेवाण करण्यासाठी एखादी व्यक्ती तुमच्यापाशी असणे.

२) आपल्याला अजून एखादे मत जाणून घ्यायचे असते.

तुमच्यापाशी आगळ्यावेगळ्या प्रकारच्या गृहपाठाच्या कल्पना, व्हिडिओ क्लिप्स आणि गेम्स आहेत परंतु तुमचा वर्ग त्याला कसा प्रतिसाद देईल याची तुम्हाला कल्पना नाही - खास करून तुमच्या वर्गाला कशाचा फायदा होईल आणि कशाचा नाही हे निश्चित करण्यासाठी मेन्टरची मदत होईल. ह्यामुळे तुम्हाला तुमच्या वर्गाला आत्मविश्वासाने शिकविण्यास आणि भविष्यात अधिक संवादात्मक शिक्षण पद्धतीचा उपयोग करण्यास मदत होईल!

३) आपल्याला वेळोवेळी चालना हवी असते

इतर कोणाही व्यावसायिकाप्रमाणे, शिक्षकांनी देखील सातत्याने स्वतःच्या ज्ञानात भर घातली पाहिजे आणि नव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. मेन्टर तुम्हाला अत्याधुनिक साधने आणि स्त्रोत याद्वारे तुम्हाला गरज असलेली नवी माहिती वेळोवेळी देऊ शकतो. काही शंका असल्यास किंवा तुम्ही वाचलेला एखादा मुद्दा समजून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता.

४) आपल्याला प्रेरणेची गरज असते

एकदा तुम्हाला ती चालना मिळाली की तुम्हाला प्रेरणेची गरज असते. तुमचा मेन्टर EdX (एडएक्स) अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे यश मिळवून उत्तीर्ण झालेला पाहिल्यास तुम्ही देखील तुमच्या पीसी समोर बसता आणि आठवड्याच्या सुटीच्या दिवशी किंवा संध्याकाळी मोकळ्या वेळी बसता त्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या कौशल्यात सुधारणा करता येते आणि करिअरच्या शिडीवर वर चढता येते. [2]

दुसरा शिक्षक, तुमचे वरिष्ठ किंवा नियुक्त केलेला मेन्टर देखील तुमचा मेन्टर बनू शकतो, फक्त प्रत्येक भेटीत तुमचे उद्दिष्ट पूर्ण होईल याची काळजी घ्या. मोठे ध्येय साध्य करण्याचा चांगला मार्ग म्हणजे लहान लहान उपाययोजना करणे, उदा. दर आठवड्याला एखाद्या संवादात्मक उपक्रमाच्या द्वारे शिकविणे आणि हळूहळू त्याची वारंवारिता वाढविणे. लहान लहान गोष्टींचे स्पष्टिकरण घेण्यासाठी, स्वतःसाठी एक मेन्टर निश्चित करा आणि त्या बैठका घ्या!