पालकांनी स्क्रीन टाइम ला का घाबरू नये

 
 
टीव्ही
स्मार्टफोन्स
टॅबलेट्स
शाळेतील पीसी
आणि घरातील पीसी
"स्क्रीन टाइम" सर्वत्र असतो आणि केवळ तुमच्या मुलांच्याच नाही तर तो तुमच्या दैनंदिन जीवनाचा देखिल एक अत्यावश्यक घटक बनलेला असतो.
 
मग, स्क्रीन टाइम (पडद्यासमोरील कालावधी) ला का घाबरावे?
 
डिजिटल पालकत्वातील मातब्बर म्हणून, पीसी चे मोकळ्या मनाने स्वागत करा. या पीसी चा उपयोग तुमच्या मुलांना त्यांच्या वर्गमित्रांपेक्षा सरस होण्यात मदत मिळण्यासाठी
 
तसेच भविष्याला सामोरे जाण्यासाठी होणार आहे. स्क्रीन टाइम ला तुम्ही का घाबरू नये याची तीन कारणे पुढे दिली आहेत :
 
1. अभ्यासाची पुस्तके जिवंत होऊ शकतात
 
तुमच्या मुलांचे वय किंवा ती अभ्यास करत असलेला विषय काहीही असले तरी पीसीच्या मदतीने पुस्तके अक्षरशः जिवंत होऊ शकतात. पीसी च्या मदतीने पुस्तकातील गोष्टी दैनंदिन जीवनातील घडनांशी जोडता येतात आणि त्या जास्त काळ लक्षात राहतात. हवामान बदला-बद्दल पुस्तकात दिलेली माहिती केवळ वाचण्याऐवजी त्यावरची एखादी छोटी फिल्म बघण्याचा परिणाम जास्त असतो. तुमच्या मुलांमध्ये घडून येणारा बदल पाहण्यासाठी एकदा तरी प्रयत्न करून पहा.
 
2. प्ले टाइम हा फक्त खेळण्यासाठी नसतो
 
शाळेतील दिवसभराचा वेळ, मग विविध क्लासेस, शिकवण्या, अभ्यासेतर गोष्टी, क्रीडा इत्यादी सर्व करून थकल्यानंतर तुमच्या मुलांना थोडासा वेळ विश्रांती साठी देणे आवश्यक असते. त्या वेळात विश्रांती घेऊन ती मुले दुस-या दिवसाला सामोरी जायला तयार होतात. तासभर खेळ खेळल्याने त्यांचा थकवा, तणाव नक्कीच कमी होतो. तसेच त्यामुळे त्यांची समस्या सोडवण्याची कौशल्ये देखिल वाढीस लागतात. खेळ हा परिस्थितीजन्य असो किंवा शैक्षणिक खेळ असो, तुमची मुले आनंद घेता घेता नविन गोष्टी देखिल शिकत असतात.
 
3. तो फॅमिली टाइम (कौटुंबिक वेळ) देखिल बनू शकतो!
 
पीसी समोर बसून खेळणे हे तुमच्या मुलांनी एकट्यानेच करावे असे काही नाही. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून करण्यासारख्या गोष्टी देखिल उपलब्ध आहेत. केवळ एखादा व्हिडिओ पहाणे किंवा त्याबद्दल बोलणे हे देखिल पीसी टाइम ला फॅमिली टाइम बनवू शकते. तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे की वेळ काढा आणि पीसी वरील कोणती गोष्ट तुमच्या कुटुंबासाठी योग्य आहे ते शोधा. प्रत्येक वयोगटातील प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही नक्कीच उपलब्ध असते.
 
पालकांचे नियंत्रण नसेल तर मुले पीसी च्या नादाने वाहावत जाणे शक्य असते. म्हणूनच शैक्षणिक स्त्रोत निवडण्याआधी स्वतःला पुढील प्रश्न विचारा आणि मग तुमच्या पाल्याला भविष्यातील तंत्रज्ञानातील जाणकार व्यक्ती बनताना पहा.