तुमच्या पाल्याचे पहिले शैक्षणिक गॅझेट पीसी हे का असावे?

पाल्यासाठी त्याचे पालक व शिक्षक हे अतिशय महत्वाचे सल्लागार असतात. मुले त्यांच्या पालकांना प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारून त्यांची उत्तरे मिळविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात [1]

सल्लागार किंवा गुरू जरी विश्वासार्ह असले तरी त्यांच्यातही काही त्रुटी असू शकतात. उदाहरणार्थ पालकांना नेहमीच सगळे माहिती असेल असे नसते व शिक्षक नेहमीच उपलब्ध असू शकत नाहीत. तसेच मुलांमध्ये निवडक प्रतिसाद प्रणाली असते. अधिकांश मुले दृश्य, श्राव्य आणि रंग यांना उत्तम प्रतिसाद देतात [2]. त्यामुळे हे महत्वाचे आहे कि आपल्या पाल्याची अंगभूत शैक्षणिक क्षमता आपण वृद्धिंगत करावी. येथेच आपला विश्वासू मित्र - कंप्यूटर आपल्या मदतीस येतो.

" पालकांना नेहमीच सगळे माहिती असेल असे नसते व शिक्षक नेहमीच उपलब्ध असू शकत नाहीत."

मुले जिज्ञासू असतात आणि त्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची उत्सुकता असते. त्यांना जगातील प्रत्येक गोष्ट जाणून घेऊन उपलब्ध असलेले सर्व पर्याय माहित करून घ्यायचे असतात. कंप्यूटरच्या मदतीने मुले इंटरनेट वर उपलब्ध असलेली सर्व शैक्षणिक माहिती ज्ञात करून घेऊ शकतात.

कंप्यूटर मुळे तुमच्या पाल्यामध्ये असलेल्या अनाकलनीय क्षमतांचा विकास होण्यास मदत मिळते. 1993 मध्ये केलेल्या पहाणीनुसार असे आढळून आले आहे की, बालवाडीतील मुलांना जेव्हा कंप्यूटर समोर बसवले गेले तेव्हा 90% वेळा त्यांचे दिलेल्या कामामध्ये लक्ष एकाग्र झाले होते.

सायकॉलॉजी टूडे मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुराव्यांनुसार दृश्य प्रतिमा आणि रंग असलेले संवादात्मक पाठ मुलांची समजून घेण्याची आणि माहिती नीट लक्षात ठेवण्याची क्षमता वाढवितात. शैक्षणिक कार्यक्रमांमुळे प्रश्न सोडविण्याचे कौशल्य विकसित होते तर संकल्पनांवर आधारित मजेशीर खेळांमुळे मुलांची ज्ञान ग्रहण करण्याची आणि ते लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते.

डग्लस एच. क्लेमेंट्स यांच्या "द इफेक्टिव युज ऑफ कंप्यूटर्स विथ यंग चिल्ड्रेन" या पेपर मध्ये कंप्यूटर चे फायदे सिद्ध केले आहेत. त्यात ते म्हणतात की, "प्रश्न सोडविणे, चित्रे काढणे, भूमिती करणे इत्यादींसारख्या नविन पद्धतींनी जर लहान मुलांना कंप्यूटर चा वापर करण्यास दिला, तर त्याने त्यांचे गणित आणि विज्ञान हे विषय सुधारण्यास मदत मिळेल".

बहुसंख्य पालक मुलांना टॅबलेट्स आणि अन्य मोबाइल उपकरणे वापरायला जरी देत असले तरी ते पीसी प्रमाणे गुंतवून ठेवणारे आणि सहजतेचे वातावरण निर्माण करू शकत नाहीत. अतिशय लहान मुलांसाठी जरी मोबाइल उपकरणे चांगली असली तरी, ती थोडी मोठी झाल्यावर त्यांना भाषा समजू लागल्यावर आणि वाक्ये लिहिता वाचता यायला लागल्यावर त्यांना पीसी वापरायला देणे सूज्ञपणाचे ठरते कारण पीसी हा वाचन आणि लिखाणाद्वारे मुलांच्या शिक्षणास मदत करतो.

पीसी हे तुमच्या पाल्याचे पहिले प्राथमिक उपकरण असण्या मागचे सर्वात महत्वाचे कारण असे आहे की ते सध्याच्या प्रगत तांत्रिक युगातील मूलभूत किंवा अत्यंत प्रथमिक असे उपकरण आहे. नविन सहस्त्रकात झालेल्या प्रगतीचा तो उगम आहे आणि भविष्यात तुमचा पाल्य जी प्रगत उपकरणे हाताळणार आहे त्याचा पाया भक्कम करण्याचे काम तो करतो.

नीट परिपूर्ण वापर केल्यास कंप्यूटर हा तुमच्या पाल्याच्या वाढ आणि विकासातील महत्वाचा टप्पा बनू शकतो. येथे शुभम या नाशिक मधल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याचे उदाहरण दिले आहे ज्याच्याकडे स्वतःचा नविन कंप्युटर असल्यामुळे त्याच्या अभ्यासातील संकल्पना अतिशय स्पष्ट आहेत.

पीसी चे केवळ अनेक उपयोगच नाहीत तर तो सामान्यतः पालक आणि शिक्षकांना कठीण वाटणारे आभासी आणि वास्तव जगातील दुवा सांधण्याचे देखिल काम करू शकतो. तुमच्या पाल्यासाठी पीसी खरेदी करण्याचा निर्णय हा भविष्याच्या दृष्टीने नक्कीच शुभफलदायी ठरेल.