तुम्ही तुमच्या पाल्याला मेकरस्पेस मध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन का द्यावे

 

"जेव्हा आपण मुलांना प्रयोग करायला, जोखीम घ्यायला आणि त्यांच्या स्वतःच्या कल्पनांना वाव द्यायची परवानगी देतो, तेव्हा आपण त्यांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवत असतो. ते स्वतःला चांगल्याकल्पना असलेले विद्यार्थी समजू लागतात आणि त्यांच्या कल्पनांना मूर्त स्वरूप द्यायचा प्रयत्न करतात."[1]

- सिल्विया मार्टीन्ज आणि गॅरी स्टॅगर

निर्माण ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. मेकरस्पेस एक अशी जागा आहे जेथे मुले निर्माण, सहयोग, संशोधन करून विविध साहित्य आणि साधने वापरून प्रयोग करू शकतात. पालक म्हणून तुमचा तुमच्या मुलांवर खूप प्रभाव असतो आणि तुम्ही प्रोत्साहन देऊन करायला लावलेल्या मेकरस्पेस ॲक्टिविटीज् मुळे तुमच्या मुलांमध्ये आश्चर्यकारक बदल घडून येतात.

1. अनुभवजन्य शिक्षण

अनुभवजन्य शिक्षण तुमच्या पाल्याला जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये शिकवते. [2] प्रत्यक्ष अनुभवातून शिकल्यामुळे त्यांना स्वातंत्र्याचा अनुभव तर मिळतोच पण त्याचबरोबर त्यांना अजून चांगले काहीतरी करून दाखविण्याची इच्छा निर्माण होते.

2. प्रश्न विचारण्याची संधी

कित्येकदा वर्गात प्रश्न विचारायला मुले लाजतात. मेकरस्पेस मध्ये, मुले एकमेकांना प्रश्न विचारू शकतात किंवा त्यांना हवी असलेली माहिती ऑनलाइन शोधू शकतात. आधी कधी न आलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच शोधून काढायला लागल्यामुळे मुले स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतात. [3]

3. आकलन आणि सृजन कौशल्यांचा विकास होतो.

काहीही निर्देश दिलेले नसताना, कोणत्याही सूचना दिलेल्या नसताना मुले त्यांना पडणा-या प्रश्नांची उत्तरे स्वतः प्रयोग करून, ऑनलाइन शोधून काढतात. तसे करताना ती मुले विज्ञान, अभियांत्रिकी सारख्या विषयांत गढून जातात त्याचा त्यांना फायदाच होतो.[4] मुलांना स्वतः कल्पना करून प्रश्न सोडविण्याचा वाव मिळाल्यामुळे त्यांच्या आकलन आणि सृजन कौशल्यांचा व्कास होतो.

4. स्वत्वाची जाणीव

स्व त्वाच्या जाणीवेने मुलांना त्यांच्या मर्यादा आणि यांची बलस्थाने कळतात. पी सी चा वापर करून शिक्षणासोबत मेकरस्पेस चा वापर केला गेला तर त्याने तुमच्या मुलांना अभ्यासाच्या बाबतीत सृजनशील, आत्मविश्वासू आणि नियमित होण्यास मदत मिळेल. तुमची मुले स्वतःहून त्यांची बलस्थाने व मर्यादा ओळखून त्यावर नियंत्रण मिळवायला शिकतील.

5. अभ्यासातील रूची वाढेल

मेकरस्पेस मुलांना त्यांच्या आकलनशक्तीच्या हिशोबाने शिकवते त्यामुळे मुलांना अभ्यास आवडायला लागून ती स्वतःहून अभ्यास करायला लागतात. [5] मुले नविन नविन गोष्टी शिकण्यास आणि त्यांचा दैनंदिन जीवनात वापर करण्यास उत्सुक होतात.

शाळेतून घरी आल्यावर कंटाळवाणे चेहरे न ठेवता मुले उत्साहाने स्वतः तुम्हाला शाळेत काय काय केले ते सविस्तरपणे सांगतील.

या सर्व गोष्टींपेक्षा महत्वाचे म्हणजे मेकस्पेस मध्ये घालवलेला वेळ हा तुमच्या मुलांसाठी चांगला असतो कारण तेथे "मेकर माइंडसेट" घडविला जातो. हे महत्वाचे आहे कारण त्यातूनच मुले शिकलेल्या अभ्यासाचा दैनंदिन जीवनात वापर करायला शिकतात.[6]

जर तुम्हाला तुमच्या पाल्याला मेकरस्पेस मध्ये घालण्याची प्रेरणा मिळाली असेल, तर #DellAarambh चा वापर करून तुमचा अनुभव ट्विट करा.