तुम्ही घोकंपट्टीचा विरोध का केला पाहिजे

 

देशभरातील सर्व शाळांमध्ये सर्रास घोकंपट्टी केली जाते. केवळ शिक्षकच नाही तर पालक देखिल त्यांच्या मुलांना परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सांगताना आढळून येतात की "पाठ कर तरच तू पास होशील."

पण, खरोखरच याचा अपेक्षित परिणाम घडून येताना दिसतो का?

तणावग्रस्त आणि वेळेची कमतरता असणा-या मुलांना ज्या गोष्टी वारंवार वाचून देखिल समजत नाहीत त्यांना त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे घोकंपट्टी असतो. परंतु यात एक समस्या असते ती म्हणजे घोकंपट्टी करून लक्षात ठेवलेला अभ्यास एखादा दिवसच लक्षात राहू शकतो. परीक्षेपुरता तो अभ्यास लक्षात ठेवून पेपर झाल्यानंतर विसरला जातो.[1]

एखादी गोष्ट लक्षात ठेवणे हे एक चांगले कौशल्य आहे. पासवर्ड्स, पिन्स, वाढदिवस, अक्षरे आणि सूत्रे लक्षात ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी पाठांतराची आवश्यकता असते. परंतु जेव्हा एखादा विषय समजून घेण्याची वेळ येते तेव्हा घोकंपट्टीने केलेली पोपटपंची आणि उत्तरांची संक्षिप्त रूपे तुमच्या पाल्याच्या मदतीला येत नाहीत.

याला पर्याय काय?

चांगल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेश परीक्षेत अव्वल स्थान मिळविणे असो वा उज्ज्वल भविष्यासाठी नविन युगातील करिअर निवडणे असो पालकांना नेहमीच त्याच्या मुलांनी चांगले यश मिळवून स्वतःच्या पायावर उभे रहावे असे वाटत असते. मुलांमधील सुप्त गुण शोधून त्यांना आयुष्यात यशस्वी करण्यासाठी पी सी चा वापर करून घेतलेले शिक्षण हे एक चांगला मार्ग ठरू शकते.[2]

मुलांना कार्यरत ठेवण्यासाठी शाळेत आणि घरीसुद्धा पी सी चा वापर केला जाऊ शकतो. पी सी द्वारे मुलांना अनेक स्त्रोत उपलब्ध होतात, शिकलेल्या विषयांची सहजरित्या उजळणी करता येते आणि त्या विषयाच्या सर्व पैलूंचा अभ्यास करता येतो. मुले जेव्हा केवळ घोकंपट्टी न करता त्या विषयाच्या अभ्यासात स्वतः सहभागी होतात, तेव्हा त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतो. प्रयोग करून शिकत असलेल्या संकल्पनांना मूर्त स्वरूपात येताना बघणे, त्यामध्ये निर्माण होणारे प्रश्न सोडविणे आणि नविन नविन कल्पना शोधणे ही सर्व विषयाचे सखोल ज्ञान मिळविण्याची तंत्रे आहेत. अश्या प्रकारे अभ्यास करून विद्यार्थी जेव्हा एखादा विषय शिकतात तेव्हा त्याचा परिणाम अनेक पटींनी चांगला होतो.

घोकंपट्टीवर भर देणा-या पारंपारिक विचारपद्धतीपासून लांब जाणे सोपे नाही परंतु शिक्षणासाठी पी सी चा वापर सुरू केल्यास मुलांना आत्ताच्या स्पर्धेच्या युगात पाय रोवण्यास मदत मिळेल. घरी पी सी किंवा लॅपटॉप असल्यास मुलांना स्वतंत्रपणे संशोधन करता येईल, परिणामकारकरित्या शिकता येईल आणि तंत्रज्ञानावर आधारित वित्तव्यवस्थेसाठी तयार रहाता येईल.

पुरातन व्यवस्थेविरूद्ध ठामपणे उभे रहा. घोकंपट्टीला विरोध करून पी सी चा वापर करून शिकण्याच्या पद्धतीला पाठींबा देण्यास आरंभ करा. साइन अप करा आणि तुमचे मत नोंदवा.