तुमच्या पाल्याने रोज वाचन करणे आवश्यक का आहे

 

तुम्ही जितके जास्त वाचाल, तितक्या जास्त गोष्टी तुम्हाला समजतील. त्यातून तुम्ही जितके जास्त शिकाल, तितक्या जास्त ठिकाणी तुम्ही जाऊ शकाल.”

- डॉ. स्यूस

मुलांना गोष्टी का आवडतात त्याबद्दल डॉ. स्यूस यांनी चांगले विचार मांडले आहेत. रात्री झोपण्यापूर्वी असो, किंवा रविवारी दुपारी असो ज्या मुलांना वाचन करायला आवडते, ती मुले आयुष्यात नक्कीच यशस्वी बनतात - कसे ते पुढे पहा :

 

कारण #1

तुमच्या पाल्याचे वय काहीही असले तरी, वाचनामुळे मेंदूच्या डाव्या भागातील काही जागा जागृत होतात ज्या विज्ञान आणि गणिताशी संबंधित जी कामे लॉजिक वापरून करायची असतात, त्यात मदत करतात.

दिवसाला एक धडा जरी वाचला तरी तुमच्या पाल्याचा मेंदू सशक्त होईल आणि त्याची भाषा कौशल्ये विकसित होतील. तुम्हाला फक्त इतकेच शोधायचे आहे की तुमच्या पाल्याला काय वाचायला आवडते.

 

कारण #2

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, केल्या जाणाऱ्या कामात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक कौशल्यांमध्ये क्रिएटिविटी (सृजनशीलता) हे सर्वोत्तम आहे. आकलनात्मक विविधता किंवा विचारांमधील विविधता यांच्याविषयी सतत केल्या जाणाऱ्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की नियमितपणे वाचन केल्याने, कामातील परिणामकारकता वाढणे आणि प्रश्न सोडविणे यांसारखी कौशल्ये विकसित होतात.

 

कारण #3

“कोणावरही छाप पाडण्यासाठी नाही तर, स्वतःला व्यक्त करण्यासाठी जगा.”

- अज्ञात

तुमच्या मुलांनी स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडण्यासाठी शब्दसंपदा वाढवावी असे जर तुम्हाला वाटत असेल, तर त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करा. पुस्तक हे लेखकाचे व्यक्त केलेले विचार असल्यामुळे, तुमच्या मुलांना त्यांचे विचार मांडण्यासाठी त्याची नक्कीच मदत मिळते.

 

कारण #4

तुमच्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी देखिल वाचनाची खूप मदत होते. पुस्तकातील व्यक्तीरेखांना आव्हाने स्विकारताना पाहून तुमची मुले देखिल त्यांच्या आयुष्यातील समस्यांपासून दूर न पळता त्या समस्या सोडवण्यास शिकतील.

तुमच्या मुलांनी पीसी वर पुस्तके वाचावीत असे तुम्हाला वाटते का?

तसे असेल, तर ऑनलाइन वाचनासाठी पुढे काही चांगल्या वेबसाइट्स दिल्या आहेत -

लक्षात ठेवण्यासारखा आणखी एक मुद्दा म्हणजे, वाचनामुळे तुमच्या मुलांना स्टडी ब्रेक (अभ्यासापासून थोडा मोकळा वेळ) मिळतो. परीक्षेच्या वेळी मेंदूला ताजेतवाने ठेवण्यासाठी अभ्यासातून अधूनमधून थोडा मोकळा वेळ काढणे गरजेचे असते. त्यासाठी वाचनाइतका चांगला दुसरा मार्ग काय असू शकतो!