तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊ शकता - कसे ते पहा

 

प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रेरणा सहजगत्या येत नाही. काहींना ती ‘‘आतच’’ असते तर बहुतेक विद्यार्थ्यांना मधूनमधून थोडी चालना द्यावी लागते. जेव्हा विद्यार्थ्याच्या स्वतःच्या ध्येयानुसार चालना दिली जाते तेव्हा त्याचा सर्वाधिक परिणाम साध्य होतो - वर्गात सर्वाधिक गुण मिळविणे असो, एखादी चॅम्पियनशिप जिंकणे असो किंवा अगदी एखाद्या ठराविक विषयाचे अधिक ज्ञान मिळविणे असो. एक शिक्षक म्हणून, तुमच्या वर्गाला प्रेरणा देण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते पहाः

१. मला माझे गुण दाखवा!

ज्याप्रमाणे प्रौढ व्यक्तींना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी वेतनवाढ आणि पदोन्नती याद्वारे प्रेरणा दिली जाते त्याचप्रमाणे मुलांना देखील मूलतः त्यांचे गुण आणि ग्रेडस यामुळे प्रेरणा मिळते. तुमच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने मेहनत करावी यासाठी, त्यांच्या जास्तीत जास्त लहान लहान चाचण्या घ्या त्यामुळे खर्या चाचणीसाठी तुमचे विद्यार्थी नेहमीच तयार असतील!

२. प्रगतीचे कौतूक करा

तुमच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अगदी लहान प्रगती केल्यास देखील त्याचे कौतूक करा. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याने इंग्रजी संभाषण चाचणीत ६/१० वरून ८.५/१० अशी प्रगती जरी केली तरी त्याचे तोंडी कौतूक करावे आणि चाचणीमध्ये त्याला ‘‘फार छान’’ किंवा स्टार स्टिकर द्यावा - हे सर्व कौतूक करण्याच्या आणि प्रोत्साहन करण्याच्या तुमच्या व्यक्तिगत पद्धतीवर अवलंबून आहे.

३. सक्रिय शिक्षण पद्धती हाच मार्ग आहे

बहुतेक वेळा, शिक्षक हीच एकमेव अशी व्यक्ती असते जी वर्गात जास्तीत जास्त बोलत असते. पाठाचे कामकाज करताना त्यात बदल करा आणि चर्चात्मक व्हिडिओ किंवा दोन गटांमधील वादविवाद आणि शिक्षण पद्धतीच्या उपुयक्त साहित्यातील समस्या सोडविण्याचे वर्कशिटस जसे सुपर टिचर वर्कशिटस याद्वारे पाठ अधिक चर्चात्मक स्वरूपाचे करून ह्या पद्धतीत बदल करा.

४. अधिक ताकद वाढवा

तुमच्या विद्यार्थ्यात ट्रिगोनोमेट्रीमध्ये अधिक कल दिसत असल्यास, आणि त्याला खरोखर त्यात रस अल्यास, त्या विद्यार्थ्याला १०० प्रॉब्लेम चॅलेंजसाठी साईन-अप करा आणि त्याला असलेल्या स्वारस्याचे आवडीत रूपांतर करा. त्याचप्रमाणे, तुमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यात अधिक सुधारणा करण्यासाठी अनेक पीसी रिसोर्सेस उपलब्ध आहेत. तुमच्या विद्यार्थ्यांना काय आवडते आणि ती आवड पुढे जोपासण्यासाठी कोणते पीसी रिर्सोसेस उपलब्ध आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही फक्त सखोल चर्चा करण्याची गरज आहे.

तुम्ही कुशल शिक्षक असलात किंवा अगदी नवखे असलात आणि तुमच्या विषयातील तुमचे कौशल्य आणि तुम्ही वर्गात कितीही उत्साह निर्माण करत असलात तरी त्याबरोबर पीसी हे एक आवश्यक शिक्षण साहित्य आहे. हे केवळ तुमच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर तुम्हाला देखील शिकविणारे साधन आहे!