सुरक्षित पासवर्ड कसा तयार करावा यासाठी मार्गदर्शक सूचना

 

#महत्वाच्या गोष्टींचे संरक्षण

घरी किंवा शाळेत पीसी चा वापर करत असताना, महत्वाच्या असणा-या तीन गोष्टी. तुम्ही निबंध लिहित असाल, गट प्रकल्प करत असाल किंवा कुतुहल म्हणून एखादी माहिती शोधत असाल - तुमचा पीसी नेहमीच पासवर्डने संरक्षित केलेला असला पाहिजे.

अशी कल्पना करा की तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडण्यासाठी तुमच्याकडे जर किल्ली नसेल तर! त्याचप्रकारे तुमचा पीसी, तुम्ही नेहमी वापरत असलेले इमेल अकाऊंट, ऑनलाइन शैक्षणिक स्त्रोत आणि सोशल मिडिया चॅनल्स इत्यादींमध्ये लॉगइन करण्यासाठी पासवर्डची गरज भासली पाहिजे. पुढे दिलेल्या मार्गदर्शक गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही महत्वाच्या गोष्टींचे संरक्षण करू शकता.

1. मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (बहु घटक प्रमाणीकरण) सुरू करणे

या पासवर्ड दिनाची थीम आहे #LayerUp (लेयर अप). तुमच्या मोबाइल किंवा इमेल वर ओटीपी येण्याची व्यवस्था करून तुम्ही तुमच्या अकाऊंटची सुरक्षितता एका स्तराने वाढवू शकता. यामुळे तुमच्या लॉगइन प्रक्रियेत एक पायरी वाढते परंतु तुम्हाला आयडेंटिटी थेफ्ट (परिचय चोरी) आणि सोशल मिडिया अकाऊंट हायजॅकिंग (अपहरण) यांपासून उत्तम संरक्षण मिळते. [1]

2. पासवर्ड जितका लांब, तितका तो ओळखता येणे कठीण असते

तुमचा पासवर्ड म्हणून एखादा शब्द आणि एखाद- दुसरे विशेष चिन्ह यांचा वापर करण्यापेक्षा, एखादे मोठे वाक्य वापरा. त्यासाठी काही ठराविक क्रम असला पाहिजे असे नाही, फक्त तुम्हाला ते लक्षात राहिले पाहिजे. तसेच, पासवर्डमध्ये फक्त इंग्रजी भाषेचा वापर न करता, तुमची मातृभाषा किंवा तुम्हाला येत असलेली दुसरी एखादी भाषा वापरून तुमचा पासवर्ड क्लिष्ट बनवा.

3. नाव, जन्मदिनांक आणि तुम्ही रहात असलेले शहर इत्यादी सहज ओळखता येणा-या गोष्टींचा वापर करणे टाळा

सुरूवातीला तसे करणे सोपे वाटेल, परंतु तुमचा पासवर्ड जितका एकमेवाद्वितिय असेल, तितके तुमच्यासाठी चांगले असते.

स्त्रोत - https://securingtomorrow.mcafee.com/author/cybermum-india/

4. सर्वांचे मिश्रण करा - अक्षरे कॅपिटल करा, त्यात चिन्हे आणि एखादा असंबंधित शब्द मिसळा

@#$% यांच्या सोबत अधून मधून कॅपिटल केलेल्या अक्षरांमुळे तुमचा पासवर्ड ओळखणे कठीण जाते. पुढे दिलेले सर्वसामान्य पासवर्ड वापरणे टाळा. [2]

1. 123456
2. 123456789
3. password
4. admin
5. 12345678
6. qwerty
7. 1234567
8. 111111
9. photoshop
10. 123123
11. 1234567890
12. 000000
13. abc123
14. 1234
15. adobe1
16. macromedia
17. azerty
18. iloveyou
19. aaaaaa
20. 654321

5. एकदा वापरलेला पासवर्ड पुन्हा वापरू नका

आपण सर्वजण पुन्हा पुन्हा ही चूक करतो. तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक अकाऊंटचा पासवर्ड वेगळा असला पाहिजे. पासवर्ड मधील संख्या, विशेष चिन्हे किंवा अन्न, देश यांसारख्या थीम्स समान असल्या तरी चालतील.

एकदा तुम्ही तुमच्या पीसी चा उत्तम वापर करण्यास शिकलात, की मग अभ्यास करणे सुखदायी वाटू लागेल.