पाठाचे नियोजन करण्यासाठी तुमची आवश्यक ५ मुद्यांची यादी

 

‘‘एकतर तुम्ही दिवसाचा ताबा घ्या अन्यथा दिवस तुमचा ताबा घेईल.’’
- जीम रॉन

हे थोडे कठोर वाटते परंतु हे सत्य आहे. तुम्ही शाळेत शिकवत असलेल्या प्रत्येक वर्गासाठी कृती योजना तयार केल्यास, तुम्ही मुख्यत्वे अतिशय चांगल्या कामासह संपूर्ण दिवस आनंदाचा जावा यासाठी (तुम्ही आणि विद्यार्थी दोघांसाठी देखील) पाया निर्माण करता. त्याचबरोबर, तुम्ही संपूर्ण अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याच्या अगदी योग्य मार्गावर असाल.

तुमच्या पाठाचे नियोजन करताना काय लक्षात ठेवावे याची ही आहे यादीः

१. पुन्हा एक उजळणी घ्या आणि ताजेतवाने व्हा

तुम्ही मागच्या पाठातील धडा जर पुढे सुरू करणार असाल तर मुलांची थोडी उजळणी घ्या. तुम्ही नवीन विषयाला सुरूवात करणार असला तरी सुद्धा एक जलद व्हिडिओ दाखवा किंवा संवादात्मक सादरिकरणाच्या सहाय्याने मागील विषयाचा गोषवारा घ्या, त्यामुळे विद्यार्थी प्रत्येक दोन पाठांमध्ये संदर्भ लावू शकतील.

२. प्रत्यक्ष जीवनाशी संदर्भ लावा!

तुमचे विद्यार्थी काय शिकणार आहेत याची त्यांना माहिती द्या आणि त्याचा संदर्भासह स्पष्टिकरण देण्यासाठी प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणे द्या. तुम्ही एखाद्या प्रत्यक्ष जीवनातील घटनेशी संदर्भ लावू शकता, एखादी बातमी दाखवू शकता किंवा अगदी लक्ष विचलित होणार्या विद्यार्थ्याच्या देखील चांगले लक्षात राहण्यासाठी एखादी लहानशी फिल्म दाखवू शकता.

३. ग्रुप अॅक्टिविटीचा समावेश करा

प्रत्येक शिक्षकाची अशी इच्छा असते की वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी झाले पाहिजेत परंतु ते प्रत्यक्षात उतरविणे कठिण असते. अशाच वेळी ग्रुप अॅक्टिविटीजची मदत होते. पाच पर्यंत मुलांच्या लहानशा गटामध्ये घेतलेली अगदी पीसीवरील १० मिनिटांची अॅक्टिविटी देखील मुलांमध्ये उत्साह निर्माण करते.

४. पाठ तयार करणार्या साधनांचा उपयोग करा

ओपिया आणि कॉमन करिक्युलम यासारख्या ऑनलाईन साधनांची देखील तुम्हाला तुमचा पाठ अधिक संवादात्मक करण्यासाठी मदत होते. ह्यात कोडी, अनेक पर्याय देणारे प्रश्न, गोष्टी आणि इतर अनेक गोष्टीचा समावेश करा. त्यामुळे तुम्हाला दोन्ही गोष्टींचा फायदा होतो - पाठ्यपुस्तकाचा मार्गदर्शन करणारा दृष्टीकोन आणि पीसीचा संवादात्मक घटक.

५. गृहपाठ विसरू नका!

कधीकधी दिलेला गृहपाठ विषयापेक्षा संपूर्णपणे वेगळा असतो - तुम्ही दिलेल्या असाईनमेन्ट किंवा वाचन आजच्या पाठाशी संबंधित असेल याची काळजी घ्या, त्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांना शिकविलेले चटकन समजेल. त्याचप्रमाणे तुम्ही जितके अवांतर शिकवाल तितका गृहपाठाचा परिणाम अधिक होतो!

श्रीमती गौरी - मुख्याध्यापिका, यांचे - ज्यांच्या हाती तंत्रज्ञान आहे असे महान शिक्षक समाजाचे परिवर्तन कसे करू शकतात आणि तुमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रभावी पाठ तयार करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली प्रेरणा कसे देऊ शकतात ह्यासंबंधी विचार ऐका.