तुमच्या पाल्याच्या पहिल्या पीसी साठी काही महत्वाच्या गोष्टींची सूची

 

 

काम
ऑनलाइन बँकिंग
कर भरणी
सोशल मिडिया
वाचन
संशोधन
दैनंदिन जीवनात तुम्ही पीसी चा अनेक विविध प्रकारे वापर करता
तसेच तुमची मुले देखिल करतात
भविष्यात कामाच्या ठिकाणी त्यांना पीसी वापरावा लागणार आहेच. त्याची तयारी आत्तापासूनच करावी लागेल.

एकदा का तुम्ही त्यांच्यासाठी योग्य पीसी ची निवड केलीत की मग पूढे दिलेल्या सूचनांचे पालन करा. तसे केल्यास तुम्हाला काळजीचे काही कारण उरणार नाही.

1. काही पायाभूत नियम ठरविणे

मुलांनी पीसी साठी अत्यंत कठीण असा पासवर्ड ठरवणे आणि तुम्हाला तो सांगणे, फक्त बुकमार्क केलेल्या वेबसाइट्स चा वापर करणे, दिवसभरात एखाद दोन तासांपेक्षा जास्त पीसी चा वापर न करणे इत्यादी काही महत्वाचे पायाभूत नियम ठरवून त्यामागची कारणे तुम्ही पटवून दिलीत, तर तुमची मुले आनंदाने त्या अटी स्विकारतील.

2. थोडीशी काळजी घेतली तर त्याचा फायदा दीर्घकाळ होतो

एकदा चुकून तुमच्याकडून उकळता गरम चहा कीबोर्ड वर सांडला होता आणि मग तो कीबोर्ड दुरूस्त करावा लागला होता, अशा प्रकारची एखादी गोष्ट सांगून तुम्ही तुमच्या लहानग्यांना पीसी आणि त्याचे इतर भाग किती संवेदनशील असतात हे पटवून देऊ शकता. तुम्ही तुमचे स्वतःचे उदाहरण दिल्यामुळे मुले आठवणीने पीसी ची जास्त नीट काळजी घेतील.

3. पीसी मधील अवघड गोष्टी एकत्र बसून हाताळा

तुम्हाला जरी पीसी कसा वापरावा ते नीट माहित असले तरी, तुम्ही मुलांना सोबत घेऊन पीसी मधील मूलभूत गोष्टी केल्यात तर तुमच्या मुलांना त्यातून आनंद मिळेल. माऊस चा कर्सर योग्य दिशेने फिरविण्यापासून ते सलग एक पूर्ण वाक्य टाइप करण्यापर्यंत प्रत्येक लहान लहान गोष्ट एकत्र शिकल्यास मुलांना आनंद होईल.

4. पीसीच्या स्त्रोतांची सूची बनवणे

शिक्षक, इतर पालक आणि ज्यांच्या बद्दल ऑनलाइन चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत अश्या स्त्रोतांची माहिती काढा. नंतर तुमचा पाल्य जे ब्राऊजर वापरणार असेल, त्यावर ते स्त्रोत बुकमार्क करा आणि डेस्कटॉप वर त्याचे शॉर्टकट्स तयार करा.

5. मनोरंजनाचा सुद्धा अंतर्भाव करा

मनोरंजनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नुकताच प्रसिद्ध झालेला विनोद असो किंवा एखाद्या मांजरीचा गोंडस व्हिडिओ असो, तुमच्या मुलांना ते पाहण्यात नक्कीच रस असतो. तसे करताना तुमच्या लहान मुलांनी त्यांच्या वयाला न साजेसे काही पाहू नये यासाठी पीसी वर पेरेंटल कंट्रोल (पालक नियंत्रण) बसवा त्याचबरोबर पीसी हॉलसारख्या ठिकाणी ठेवा जेथे सतत घरातील मोठ्या व्यक्तींचे लक्ष राहील.

पीसी चा वापर करून, कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र बसून नविन गोष्टी शिकू शकतात, गृहपाठ करू शकतात किंवा विविध विषयांवरील माहिती वाचू शकतात. पीसी चा योग्य प्रकारे वापर केला गेला, तर त्याने तुमच्या पाल्याची शिकण्याची क्षमता वाढीस लागते.