सकारात्मक डिजिटल फूटप्रिंट (पाऊलखुणा) तयार करण्यासाठी तुमचे मार्गदर्शक

"तुम्ही ऑनलाइन जे पोस्ट करता त्यावरून तुम्ही खरे कसे आहात ते समजून येते. जाणीवपूर्वक पोस्ट करा. सावधगिरीने रीपोस्ट करा."

- जर्मनी केन्ट

 

प्रत्येकाची डिजिटल फूटप्रिंट असते

जेव्हा तुम्ही ऑनलाइन काहीतरी पोस्ट करता किंवा काहीही शेअर करता, डिजिटल फूटप्रिंट तयार होते आणि ती कायमस्वरूपी टिकून रहाते. तुमच्या सकारात्मक डिजिटल फूटप्रिंटसाठी काय करावे ते पुढे दिले आहे :

 

1. पासवर्ड कीपर चा वापर करा

सोशल मिडिया वरील तुमच्या प्रायवसी सेटिंग्ज मुळे तुमच्या पोस्ट फक्त तुमचे मित्र आणि फॉलोअर्स यांच्याबरोबर शेअर केल्या जाव्यात की सर्व लोकांबरोबर ते तुम्हाला ठरवता येते. कोणत्याही प्रकारचे हॅकिंग टाळण्यासाठी शक्तिशाली तसेच लक्षात रहाण्यासारखा पासवर्ड तयार करा.

 

2. खूप जास्त शेअर करू नका

ऑनलाइन काहीही पोस्ट किंवा शेअर करताना सावध रहा कारण तुमची सकारात्मक डिजिटल फूटप्रिंट तयार करण्यात हे महत्वाचे असते. कमेंट्सनां उत्तर देताना तुमच्या ऑनलाइन व्यक्तिमत्वाच्या अनुसार द्या. तुम्हाला माहिती नसलेल्या विषयांमध्ये गुंतू नका. तुम्ही ऑनलाइन जे काही पोस्ट करता त्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. एकदा ते ऑनलाइन गेले की ते कायमस्वरूपी राहणार हे लक्षात ठेवा. 

 

3. स्वतःला शोधा

एक साधा शोध घेऊन तुमचे नाव शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्याबद्दल काय माहिती मिळते ते पहा. तुम्हाला जे दिसेल त्याबद्दल कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. जर लोकांनी पाहू नये असे काही तुम्हाला तुमच्याबद्दल आढळून आले, तर योग्य त्या उपायांनी ते काढून टाका. यामुळे तुम्हाला हे सुद्धा समजून येईल की तुमच्या नावाने काही फेक (खोटी) अकाउंट्स वापरात आहेत का...

 

4. जुनी अकाउंट्स डिलिट करा

जुनी अकाउंट्स डिएक्टिवेट किंवा डिलिट न केल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला नकारात्मक फूटप्रिंट्स बद्दल ऐकायला मिळते. जेव्हा कधी तुम्ही तुमचे सोशल नेटवर्किंग प्रोफाइल वापरणे बंद करता, तेव्हा आठवणीने ते डिएक्टिवेट किंवा डिलिट करा ज्यामुळे त्यातील मजकूर लाइव किंवा शोध घेण्यास उपलब्ध रहाणार नाही आणि अकाउंट हॅकिंगची भीती देखिल रहाणार नाही.

 

सकारात्मक डिजिटल फूटप्रिंट असणे चांगले असते ज्यामुळे तुमच्या आयुष्याच्या विविध पैलूंवर त्याचा चांगला परिणाम होतो. तुमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी तुम्ही एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहात. म्हणून मेन्टॉर (सल्लागार) बना, प्रोत्साहन द्या आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यावर तुमचा ठसा उमटवा.