विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी तीन मार्गदर्शक गोष्टी

 

काही विद्यार्थी असतात ज्यांना वाचनाची फार आवड असते, आणि काही असे असतात जे वाचनापासून दूर पळण्यासाठी काय वाटेल ते करायला तयार असतात. एक शिक्षक म्हणून तुम्ही जाणता की शिकण्यात वाचनाचा अत्यंत महत्वाचा भाग असतो. वाचनापासून दूर राहून शिकता येणे अशक्य असते. खरंतर, विद्यार्थी जितक्या लवकर वाचायला शिकतील, तितके त्यांच्यासाठी उत्तम असते. प्रसिद्ध, चांगले लिहिलेले साहित्य जर वाचायला मिळाले, तर मुले स्वतःहून देखिल लिखाण करू लागतात. त्यांची शब्दसंपदा वाढते आणि संकल्पनांचे आकलन देखिल वाढते.

तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पुढे दिलेल्या तीन गोष्टी करा आणि फरक पहा.

1. निवड स्वातंत्र्य चांगले असते!

अभ्यासक्रमानुसार वर्गात किंवा घरी कोणता धडा वाचायचा ते निवडण्याचे स्वातंत्र्य तुमच्या विद्यार्थ्यांना द्या. प्रत्यक्षात असे करणे थोडे कठीण वाटेल, परंतु तुमचे विद्यार्थी स्वतःहून आवडीने वाचण्यास सुरूवात करतील. मोठ्याने वाचण्याचे फायदे आपणा सर्वांनाच माहित आहे आणि वर्षानुवर्षांपासून ते सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्याने वाचन करण्याची सवय लावा.

2. वाचनाला सामुहिक उपक्रम बनवा

वाचनाला साप्ताहिक उपक्रम बनविण्यासाठी, तुम्ही त्याला रीडिंग क्लब किंवा त्यासारखे काहीतरी नाव देऊ शकता. यात मुले त्यांनी नुकतेच वाचलेले पुस्तक किंवा एखाद्या पुस्तकावर बनविलेला चित्रपट यांबद्दल वर्गात चर्चा करतील. तसे करण्याने त्यांना जबाबदारीने बोलण्याची सवय लागेल. तसेच नियमितपणे वाचनाची सवय लागण्यासाठी देखिल हे उपयोगी ठरेल. 

3. विद्यार्थी उत्तम कथाकथन करू शकतात

"तुम्ही एखाद्या लेखकाचे लिखाण निवड़ून नंतर त्याचे गोष्टींचे पुस्तक बनविण्यासाठी त्यात मजकूर वाढवू शकता...विद्यार्थी ऑनलाइन त्यांचे लेख लिहू शकतील अशी साइट मी येथे देत आहे."

Larry Ferlazzo

शिक्षक, लेखक, ब्लॉगर.

स्टोरीबर्ड चा वापर करून विद्यार्थांना त्यांच्यातील कथाकार शोधण्यास मदत करा. हे संवादात्मक आणि मोफत असलेले पीसी वरील साधन तुमच्या विद्यार्थ्यांना कल्पक बनवेल आणि त्यांना अधिकाधिक नविन कल्पना मिळविण्यासाठी जास्त वाचन करण्यास प्रेरित करेल. या साधनाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सूप्तकल्पनांना मुक्तपणे वापरता येते.

आता तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावण्याचे मार्ग सापडले आहेतच. चला तर मग पीसी चा वापर करून त्यांना प्रेरणा देखिल द्या.