घोकंपट्टी म्हणजे जे काही शिकतो आहोत त्याचा अर्थ किंवा बाकी गोष्टींशी त्याचा असलेला संबंध लक्षात न घेता केवळ परत परत वाचून ते शिकणे किंवा लक्षात ठेवणे.
या बद्दल विचार करा.
आपण लहानपणी इतिहास तोंडपाठ केला परंतु त्या घटनांचा सध्याच्या अर्थशास्त्रावर आणि राजकारणावर होणारा परिणाम आपल्याला समजून घेता येत नाही. आपण भौतिकशास्त्रातील सिद्धांत पाठ केले परंतु त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करण्याची वेळ आली की आपण गोंधळून जातो.
अभ्यासापेक्षा आपण घोकंपट्टी वर जास्त भर देतो. आपल्या शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये ब-याचदा अगदी सहजपणे "रट्टा मार" हा वाक्प्रचार ऐकू येतो. या घोकंपट्टी मुळे विद्यार्थी बाह्य जगाला सामोरे जाताना नीट तयार नसतात.वैचारिक दृष्ट्या परिपक्व नसतात.
केवळ तेवढेच नाही तर घोकंपट्टीमुळे अभ्यास कंटाळवाणा, नीरस आणि गुंतवूनठेवण्यास असमर्थ असा बनतो.
आता हे सर्व बदलण्याची वेळ आली आहे.
पी सी चा वापर करून केला गेलेला अभ्यास हा घोकंपट्टी पेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगला पर्याय आहे. यात संकल्पना समजण्यावर भर दिला जातो ज्यामुळे त्या गोष्टी नीट समजून दैनंदिन जीवनात त्यांचा सहजतेने वापर करता येतो. मुख्य म्हणजे,या पद्धतीने शिकण्याचा आनंद मिळतो.
शिक्षणासाठी वर्गात आणि घरी पी सी चा वापर केला, तर त्यामुळे अभ्यास सुलभ होतो आणि सर्वांना करता येतो. तसेच केवळ चांगले गुण मिळविण्यापेक्षा ज्ञान मिळविण्यावर या पद्धतीत भर दिला जातो.
आजच या बदलाची सुरूवात करूया. साईन अप करा आणि घोकंपट्टी करून अभ्यास करण्याच्या पद्धतीच्या विरोधास तुमचा पाठींबा दर्शवा.
सर्वांनी एकत्र येऊन शिक्षणाच्या 'आरंभ' या नविन प्रवाहाची सुरूवात करूया.
पी सी चा वापर करून केलेला अभ्यास.